मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोरोना लस घेणार त्याला Uber ची फ्री राईड मिळणार; असं करा बुकिंग

कोरोना लस घेणार त्याला Uber ची फ्री राईड मिळणार; असं करा बुकिंग

जे लोक कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनाच या फ्री राईड सुविधेचा फायदा मिळणार आहे. प्रोमो कोडद्वारे फ्री राइडिंगचा फायदा घेता येईल.

जे लोक कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनाच या फ्री राईड सुविधेचा फायदा मिळणार आहे. प्रोमो कोडद्वारे फ्री राइडिंगचा फायदा घेता येईल.

जे लोक कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनाच या फ्री राईड सुविधेचा फायदा मिळणार आहे. प्रोमो कोडद्वारे फ्री राइडिंगचा फायदा घेता येईल.

नवी दिल्ली, 8 एप्रिल : जर तुम्ही कोरोना लस (Corona Vaccination) घेण्यासाठी जात असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अमेरिकी अ‍ॅप बेस्ड कॅब कंपनी उबरने (Uber)मोठी घोषणा केली आहे. कंपनीकडून कोरोना लस घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना फ्री राईडची सुविधा दिली जाईल असं सांगण्यात आलं आहे. कंपनीने दिल्ली सरकारीची मदत करण्यासाठी ही निर्णय घेतला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, उबरने दिल्लीत 1.5 कोटी रुपयांच्या फ्री राईडची घोषणा केली आहे. त्याशिवाय याआधीही कंपनीने एनजीओ आणि मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली अफेयरसाठीही मदतीची घोषणा केली होती.

या लोकांना मिळेल फायदा -

दिल्लीशिवाय इतर 34 शहरांमध्ये ही सुविधा दिली जाणार आहे, ज्याद्वारे 10 कोटी रुपये इतकी फ्री राईड देण्याचं सांगण्यात आलं आहे. जे लोक कोरोना लस घेण्यासाठी पात्र आहेत, त्यांनाच या फ्री राईड सुविधेचा फायदा मिळणार आहे. प्रोमो कोडद्वारे फ्री राइडिंगचा फायदा घेता येईल.

(वाचा - Aadhaar Card वरचा फोटो आवडला नाही? असा करा अपडेट)

- सर्वात आधी मोबाईलमध्ये Uber App वर जावून Wallet सिलेक्ट करावं लागेल.

- त्यानंतर Add promo code पर्यायावर सिलेक्ट करा.

- आता खाली 10MV21V कोड अ‍ॅड करावा लागेल.

- हा वॅक्सिनेशन प्रोमोशन कोड दिल्ली एनसीआरच्या सर्व Uber युजर्सच्या अ‍ॅपमध्ये दिसेल.

(वाचा - तुमच्या फोनमध्ये हे 5 Govt. App असायलाच हवेत; जाणून घ्या कसा होईल फायदा)

पिक आणि ड्रॉप सुविधा -

कंपनी ग्राहकांना पिक अँड ड्रॉप सुविधा देणार आहे. प्रोमो कोड अ‍ॅपमध्ये जोडल्यानंतर उबरच्या फ्री राईडद्वारे वॅक्सिनेशन सेंटरवर जाता येईल. तसंच हा प्रोमो कोड परत येतानाही लागू असेल.

150 रुपये राईड व्हॅल्यू -

कंपनीने ही राईड व्हॅल्यू जवळपास 150 रुपये असेल, असं सांगितलं आहे. 'सर्व नागरिकांचं वॅक्सिनेशन होण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारची मदत करण्यासाठी उत्साहित आहोत. आम्ही MoveWhatMatters अंतर्गत नेहमी वॅक्सिनेशन ड्राईव्हला सपोर्ट करु' असं Uber इंडिया आणि साउथ एशिया अध्यक्ष प्रभजीत सिंह यांनी याबाबत बोलताना सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination