आता चालताना एकटेपणा नाही जाणवणार उबेरनं आणला 'ही' नवी ऑफर

आता चालताना एकटेपणा नाही जाणवणार उबेरनं आणला 'ही' नवी ऑफर

कॅब सेवा देणारी उबर कंपनीची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. नेमकं असं काय घडलंय? वाचा सविस्तर

  • Share this:

मुंबई, 17 जानेवारी: कॅब सेवा देणारी कंपनी उबरने ग्राहकांसाठी आता आणखी एक नवा उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या या नव्या सेवेची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. उबर अॅपमध्ये आता आणखी एक सेवा अॅड झाली आहे. ती म्हणजे Walking Buddyची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल Walking Buddy ही सेवा नेमकी काय आहे?

ट्विटवर एक फोटो शेअर होत आहे. तुम्ही जर एकटेच चालत असाल तर तुम्हाला चालण्यासाठी पार्टनर देणार असल्याची चर्चा होत आहे. तसा ऑफशन उबर अॅपवर देण्य़ात आला आहे. यासाठी ग्राहकाला 7.50 डॉलर मोजावे लागणार आहेत. उबर अॅपचा हा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

उबरच्या या सेवेची काही नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे तर काही लोक अशी काही सेवा उबर सुरू करत आहे हे ऐकून हैराण झाले आहेत. या पोस्टला आतापर्य़ंत सोशल मीडिय़ावर 2.5 लाख लाईक्स मिळाल्या आहेत. 70 हजार हून अधिक वेळा रिट्वीट करण्य़ात आलं आहे. उबरनेही आपल्या ट्विटर अकाऊंटरवर हा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2020 02:16 PM IST

ताज्या बातम्या