मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /कोणत्याही स्मार्टफोनला चार्जिंग पोर्टबाबत पाळावा लागेल 'हा' नियम

कोणत्याही स्मार्टफोनला चार्जिंग पोर्टबाबत पाळावा लागेल 'हा' नियम

आगमी काळात देशात लाँच होणार्‍या सर्व स्मार्टफोन्समध्ये फक्त एकाच प्रकारचा चार्जिंग पोर्ट असेल

आगमी काळात देशात लाँच होणार्‍या सर्व स्मार्टफोन्समध्ये फक्त एकाच प्रकारचा चार्जिंग पोर्ट असेल

आगमी काळात देशात लाँच होणार्‍या सर्व स्मार्टफोन्समध्ये फक्त एकाच प्रकारचा चार्जिंग पोर्ट असेल

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 10 जानेवारी :   मोबाईल फोन कोणताही असो त्याला चार्जिंग असणं फार गरजेचं आहे. चार्जिंग नसेल तर महागड्या फोनचादेखील काहीही उपयोग होणार नाही. भारतात स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी वेगवेगळे चार्जर वापरले जातात. आतापर्यंत स्मार्टफोनमध्ये चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट, टाइप सी चार्जिंग पोर्ट तसेच लायटनिंग पोर्ट दिले जात होते. मात्र, आता या किरकोळ वाटणाऱ्या मुद्द्यावर सरकारनं कडक नियम लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात देशात लाँच होणार्‍या सर्व स्मार्टफोन्समध्ये फक्त एकाच प्रकारचा चार्जिंग पोर्ट असेल. आयफोन असो किंवा स्वस्त अँड्रॉइड स्मार्टफोन, सर्व फोनमध्ये टाइप-सी चार्जिंग पोर्ट दिला जावा, असा नियम सरकारनं केला आहे. ‘झी न्यूज’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    का घेतला निर्णय?

    टाइप-सी चार्जरला भारतात कॉमन चार्जर बनवण्यात आलं आहे. ई-कचरा कमी करणं हे त्यामागील कारण आहे. प्रत्येक स्मार्टफोनसाठी स्वतंत्र चार्जर बनवल्यामुळे ई-कचरा वाढत आहे. भारत सरकारनं ही समस्या गांभीर्यानं घेतली आहे आणि टाइप सी चार्जरला स्टँडर्ड केबल म्हणून घोषित केलं आहे.

    टाइप-सी चार्जिंग केबलचा वापर केवळ स्मार्टफोनच नाही तर लॅपटॉप, नोटबुक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठीदेखील केला जाईल. ही या नियमातील सर्वोत्तम बाब आहे. भारतीय मानक ब्युरोनं (बीआयएस) म्हटलं आहे की, भारतात विकल्या जाणार्‍या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी टाइप-सी स्टँटर्ड आणलं जाईल.

    एका चुकीमुळं हॅक होऊ शकतो तुमचा Smartphone अन् WhatsApp; त्वरित बदला ‘हे’ सेटिंग

    ...तर कारवाई होणार!

     स्मार्टफोन निर्मिती कंपनीनं हा नियम पाळला नाही तर तिच्यावर कारवाई केली जाईल. नवीन नियम वापरकर्त्यांच्या गरजा आणि पर्यावरणाचं हित लक्षात घेऊन तयार करण्यात आला असून, त्यात आता कोणताही बदल शक्य नाही. येत्या काळात प्रत्येक श्रेणीतील एक लाख 10 हजार स्मार्टफोनमध्ये फक्त टाइप सी चार्जिंग पोर्ट दिसेल.

    भारतातील या नियमाचा आयफोन निर्मात्या अ‍ॅपलला सर्वांत जास्त फटका बसण्याची शक्यता आहे. कारण, आयफोनमध्ये लायटनिंग पोर्ट असतात. इतर कोणत्याही चार्जरनं आयफोन चार्ज होत नाही. भारतातील चार्जिंग पोर्ट नियमाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आयफोनलादेखील आपल्या चार्जिंग पोर्टमध्ये बदल करणं बंधनकारक होईल. हीच गोष्ट लक्षात घेऊन अ‍ॅपल कंपनीनं iPhone 15च्या चार्जिंग पोर्टमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. पॉवर ऑन न्यूज लेटरच्या लेटेस्ट एडिशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनी iPhone 15 मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट बसवू शकते.

    First published:

    Tags: Smartphone, Technology