नवी दिल्ली, 22 जानेवारी : जर तुम्ही टू-व्हीलर
(Two Wheeler) चालवत असाल, तर हेल्मेट
(Helmet) घालणं अनिवार्य आहे. पण अनेकदा टू-व्हीलर चालक याबाबत अतिशय बेजबाबदार, निष्काळजीपणा करत असल्याचं पाहायला मिळतं. हेल्मेट खरेदी करताना पैसे वाचवण्याच्या नादात स्वस्तातलं हेल्मेट खरेदी करतात. असं हेल्मेट खरेदी करताना एखाद्या अपघातावेळी
(Accident) किती सुरक्षा करू शकतं हेदेखील पाहिलं जात नाही. काहींना हेल्मेट खरेदी करताना नेमकं कसं घ्यावं याबाबत समस्या येते. परंतु काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही चांगल्या प्रतिचं हेल्मेट खरेदी करू शकता.
ट्रॅक डे हेल्मेट -
जर तुमच्याकडे स्पोर्ट्स बाइक
(Sports bike) असेल, तर तुम्ही ट्रॅक डे हेल्मेट
(Track Day Helmet) खरेदी करणं फायद्याचं ठरेल. हे फुल फेस हेल्मेट आहे, जे अधिक सुरक्षा देतं. या हेल्मेटमध्ये वरच्या बाजूला एयर वेंट असतात, ज्याद्वारे हवा पास होण्यास मदत होते. याची किंमत तुलनेने अधिक आहे, परंतु सुरक्षेच्यादृष्टीने हे हेल्मेट फायद्याचं ठरतं.
ADV हेल्मेट -
रेस हेल्मेटशिवाय, अॅडव्हेंचर मोटरसायकलिस्टसाठी एडीवी हेल्मेट, मॉड्युलर हेल्मेट मोटोक्रॉस हेल्मेट आहे. हे सर्व हेल्मेट वेगवेगळ्या उद्देशांसाठी असतात. परंतु या सर्वांमध्ये फुल फेस हेल्मेट सुरक्षित ठरतात.
सेफ्टी रेटिंग -
सेफ्टी रेटिंग हेल्मेट
(Safety Rating Helmet) अनेक सुरक्षा स्तरांवर चाचणी केल्यानंतर तयार केले जातात. हे सर्वसाधारण हेल्मेटच्या तुलनेत महाग असतात. परंतु गरजेच्या वेळी पूर्ण कव्हरेज देतात. भारतात हेल्मेटसाठी ISI मानक आहे. त्याशिवाय स्नेल मेमोरियल फाउंडेशन
(SNELL), इकोनॉमिक कमिशन ऑफ यूरोप
(ECE), सेफ्टी हेलमेट असेसमेंट अँड रेटिंग प्रोग्राम
(SHARP) आणि परिवहन विभाग
(DOT) चेही सुरक्षा मानक आहेत.
डबल-डी लॉक -
ज्यावेळी हेल्मेट खरेदी कराल, त्यावेळी तुम्ही निवडलेल्या हेल्मेटला डबल-डी लॉक
(Double-D rings) असल्याची खात्री करा. डबल-डी लॉकवाले हेल्मेट फास्टनरच्या एका बाजूला दोन धातूच्या डी-रिंगने जोडलेले असतात. हेल्मेट घातल्यानंतर या रिंग चारही बाजूने एक गाठ तयार करतात, ज्यावर झटका लागला तरी ते सहजपणे ओपन होत नाही. अपघातावेळी हे रायडरच्या डोक्यातून निघत नाही आणि गंभीर दुखापतीपासून बचाव होऊ शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.