Home /News /technology /

Twitter कडून एलोन मस्कच्या ऑफरवर प्रतिक्रिया, म्हणाले..

Twitter कडून एलोन मस्कच्या ऑफरवर प्रतिक्रिया, म्हणाले..

Elon Musk

Elon Musk

टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी ट्विटरला 43.4 अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याची ऑफर दिली आहे. मस्कने कंपनीतील उर्वरित भागभांडवल 54.20 डॉलर प्रति शेअर या दराने विकत घेण्याची ऑफर दिली आहे. सध्या ते ट्विटरचा सर्वात मोठा एकल शेअरहोल्डर आहे. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला उर्वरित स्टॉक विकत घेऊन ट्विटरची मालकी मिळवायची आहे.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 14 एप्रिल : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलोन मस्क (Elon Musk) यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर (Twitter) इंकनेही गुरुवारी प्रतिक्रिया दिली आहे. इलॉन मस्क हे सध्या ट्विटरचे सर्वात मोठे एकल शेअरहोल्डर आहेत. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला उर्वरित स्टॉक विकत घेऊन ट्विटरची मालकी मिळवायची आहे. ट्विटरने दिलं उत्तर ट्विटरच्या बोर्डाने गुरुवारी सांगितले की ते एलोन मस्कच्या प्रस्तावावर विचार करेल. मस्ककडून कंपनीला 43.4 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर मिळाल्याची पुष्टीही केली. ट्विटरने सांगितले की कंपनीचे संचालक मंडळ या प्रस्तावाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करेल. सर्व भागधारकांच्या हितासाठी जे चांगले आहे ते आम्ही घेऊ. ट्विटरने गुरुवारी यूएस स्टॉक मार्केटला पाठवलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की एलोन मस्कने कंपनीचे उर्वरित शेअर्स 54.20 डॉलर प्रति शेअर या दराने खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. या किंमतीची एकूण रक्कम सुमारे 43 अब्ज डॉलर असेल.

  सरकारच्या 'या' निर्णयामुळे कारच्या किमती वाढणार; या गाड्यांच्या विक्रीवर होणार सर्वाधिक परिणाम

  मस्कचा हिस्सा विकण्याचा इशारा! मीडिया रिपोर्ट्सनुसार, इलॉन मस्क यांनी ट्विटरचे चेअरमन ब्रेट टेलर यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "गुंतवणूक केल्यापासून, मला आता हे समजले आहे की कंपनी तिच्या सध्याच्या स्वरूपात ही सामाजिक गरज विकसित करणार नाही किंवा पूर्ण करणार नाही. ट्विटरला खाजगी कंपनी बनवण्याची गरज आहे. त्यांचा प्रस्ताव हा पूर्ण आणि अंतिम प्रस्ताव असल्याचे मस्क यांनी म्हटले आहे. टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक मस्क यांनी ही शेवटची आणि सर्वोत्तम ऑफर असल्याचे म्हटले आहे. ही ऑफर स्वीकारली नाही, तर मी शेअरहोल्डर म्हणून माझ्या पदाचा पुनर्विचार करेन, असेही मस्क म्हणाले. म्हणजेच ते कंपनीतील त्यांचे स्टॉक विकू शकतात. मस्क यांच्या गुंतवणुकीची माहिती मिळाल्यापासून ट्विटरच्या शेअरमध्ये चांगली वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून ट्विटरच्या स्टॉकमध्ये 18.5 टक्के वाढ झाली आहे. कोर्टात केस दाखल केली आहे काही दिवसांपूर्वीच काही माजी ट्विटर शेअरहोल्डर्सनी अमेरिकेतील मॅनहॅटनच्या फेडरल कोर्टात इलॉन मस्कच्या विरोधात खटला दाखल केला होता. त्यांचा आरोप आहे की टेस्लाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने केली आणि फेडरल कायद्यानुसार गुंतवणुकीबद्दल प्रदान करणे आवश्यक असलेली माहिती रोखली. मस्कने त्याच्या गुंतवणुकीची माहिती लपवून ठेवली जेणेकरून त्याला ट्विटरचे अधिक शेअर्स स्वस्तात विकत घेता येतील.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Elon musk, Twitter

  पुढील बातम्या