Home /News /technology /

Twitter New Feature : टिक-टॉक सारखं काम करेल ट्विटरचं नवं फीचर; चेक करा डिटेल्स

Twitter New Feature : टिक-टॉक सारखं काम करेल ट्विटरचं नवं फीचर; चेक करा डिटेल्स

ट्विटरचे हे नवीन फीचर टिकटॉकच्या फीचरसारखेच आहे, ज्यामध्ये युजर्स एखाद्याच्या व्हिडीओला स्वतःच्या फोटो किंवा व्हिडीओसह उत्तर देऊ शकतात. ट्विटरला देखील असे मजेदार फीचर सादर करून आपल्या युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवायचे आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 9 जानेवारी : ट्विटरकडून (Twitter) आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर नेहमीच आणले जातात. अलीकडेच ट्विटरने आपल्या युजर्ससाठी TikTok सारखे एक उत्कृष्ट फीचर जारी केले आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने याला ट्विट टेक (Tweet Take) असे नाव दिले आहे. ट्विटरने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या नवीन फीचरद्वारे कंपनी आपल्या यूजर्सना 'कोट ट्विट विथ रिअॅक्शन'ची (Quote Tweet with reaction) सुविधा देणार आहे. या फीचरबद्दल जाणून घेऊया. ios Beta व्हर्जनसाठी रोल आउट होईल सध्या, युजर्सना त्यांच्या कोटसह कोणाच्याही ट्विटला उत्तर देण्यासाठी Quote Tweet पर्यायावर क्लिक करावे लागत होते. पण आता त्याच कोट रिप्लायमध्ये तुम्ही तुमचा फोटो किंवा व्हिडीओसह रिप्लाय देखील करू शकाल. ट्विटरने ट्विट करून या फीचरची माहिती दिली आहे. तुम्ही हे फीचर कसे वापरू शकता हे देखील सांगितले आहे. 'कोट ट्विट विथ रिअॅक्शन' हे फिचर सध्या iOS बीटा व्हर्जनवर रिलीझ करण्यात आले आहे. म्हणजेच यावेळी iOS चे बीटा युजर्स या नवीन फीचरची चाचणी घेतील. त्यानंतर हे फीचर अँड्रॉइड युजर्ससह इतर सर्व युजर्ससाठीही सुरू होईल. ट्विटरचे नवीन फीचर ट्विटरचे हे नवीन फीचर टिकटॉकच्या फीचरसारखेच आहे, ज्यामध्ये युजर्स एखाद्याच्या व्हिडीओला स्वतःच्या फोटो किंवा व्हिडीओसह उत्तर देऊ शकतात. ट्विटरला देखील असे मजेदार फीचर सादर करून आपल्या युजर्सना आपल्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवायचे आहे. आता ट्विटरचे हे नवीन फीचर युजर्सला कितपत आवडते हे पाहावे लागेल. ट्विटरचे हे नवीन फीचर त्याच्या जुन्या फीचर फ्लीट्ससारखे (Fleet Feature) आहे. फ्लीट्स फीचर इंस्टाग्राम स्टोरीज सारखेच असायचे, ज्यामध्ये युजर्स त्यांच्या गॅलरीतून कोणताही फोटो किंवा व्हिडीओ ट्विट करू शकत होते आणि ते इंस्टाग्राम स्टोरीज प्रमाणे 24 तासांनंतर आपोआप निघून जात होते. ट्विटरने हे फीचर लॉन्च झाल्यानंतर केवळ 8 महिन्यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये बंद केले. आता यावेळेस ट्विटर फ्लीट्स प्रमाणेच एक नवीन फीचर सादर करत आहे आणि त्याला ट्विट टेक असे नाव देण्यात आले आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Tech news, Twitter

    पुढील बातम्या