मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter वर का कमी होतायेत युजर्सचे फॉलोवर्स, समोर आलं महत्त्वपूर्ण कारण

Twitter वर का कमी होतायेत युजर्सचे फॉलोवर्स, समोर आलं महत्त्वपूर्ण कारण

गुरुवारी (2 डिसेंबर) रात्रीपासून कित्येक ट्विटर युजर्सच्या फॉलोअर्सची (Twitter users losing followers) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत कित्येक भारतीयांनी ट्विटही केलं.

गुरुवारी (2 डिसेंबर) रात्रीपासून कित्येक ट्विटर युजर्सच्या फॉलोअर्सची (Twitter users losing followers) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत कित्येक भारतीयांनी ट्विटही केलं.

गुरुवारी (2 डिसेंबर) रात्रीपासून कित्येक ट्विटर युजर्सच्या फॉलोअर्सची (Twitter users losing followers) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत कित्येक भारतीयांनी ट्विटही केलं.

नवी दिल्ली, 4 डिसेंबर : गुरुवारी (2 डिसेंबर) रात्रीपासून कित्येक ट्विटर युजर्सच्या फॉलोअर्सची (Twitter users losing followers) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं दिसून आलं आहे. याबाबत कित्येक भारतीयांनी ट्विटही केलं. कित्येक सेलिब्रिटींचे तर लाखो फॉलोअर्स कमी झाले आहेत. तुमचेही फॉलोअर्स असे अचानक कमी झाले असतील, तर घाबरू नका. ट्विटरच्या क्लीनअप एक्सरसाइजमुळे (Twitter clean-up exercise) हे होत असल्याचं समोर आलं आहे.

काय असते क्लीनअप एक्सरसाइज?

ट्विटर किंवा कोणत्याही मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल मीडिया साइटवर फेक अकाउंट्स किंवा बॉट्सची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशी अकाउंट्स शोधून ती बंद करण्यासाठीच या कंपन्या नियमितपणे असे क्लीनअप एक्सरसाइज (Clean-up exercise to catch bots) करतात. यासाठी ट्विटरकडून अकाउंट होल्डर्सना आपला पासवर्ड आणि फोन नंबर यांसारख्या डीटेल्सची पुन्हा खात्री (Confirm Password and Phone number) करण्यास सांगितली जाते. याची वेळेत पुष्टी झाली नाही, तर ट्विटर फॉलोअर्समध्ये ते अकाउंट सहभागी करत नाही.

फेक मेसेजेस पसरणं किंवा स्पॅम रोखण्यासाठी (Twitter against spam) ट्विटरने या वर्षीच्या जून महिन्यातही अशाच प्रकारची एक्सरसाइज केली होती. त्या वेळी अनुपम खेर आणि इतर काही सेलेब्रिटींनी दोन-तीन दिवसांमध्ये 80 हजारांहून अधिक फॉलोअर्स कमी झाल्याचं म्हटलं होतं. त्या वेळी ट्विटर सपोर्टने केलेल्या एका ट्विटमध्ये (Twitter Support) या क्लीनअप एक्सरसाइजबाबत माहिती दिली होती.

डॉक्टर थेट WhatsApp वर उपलब्ध; फक्त ‘Hi’ पाठवा अन् विनामूल्य तज्ज्ञांचा सल्ला

“तुम्हाला तुमच्या फॉलोअर्सच्या संख्येत काही प्रमाणात चढ-उतार दिसेल. ज्या अकाउंट्सनी आपला पासवर्ड आणि फोन नंबरची पुष्टी केली नाही, त्यांना आम्ही इतरांच्या फॉलोअर काउंटमध्ये सहभागी करत नाही. केवळ फोन नंबर आणि पासवर्ड कन्फर्मेशन दिलेल्या अकाउंट्सची संख्या तुमच्या फॉलोअर काउंटमध्ये दिसेल. आम्ही स्पॅम रोखण्यासाठी आणि सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी नियमित स्वरूपात ही प्रक्रिया राबवतो,” असं ट्विटरने आपल्या ट्विटमधून स्पष्ट केलं होतं.

मोबाइल रिचार्ज करुन दुकानदारांना पैसे कसे मिळतात?

म्हणजेच, तुमच्या फॉलोअर्सची संख्या आता कमी दिसत असली, तरी त्यांपैकी जे कोणी आपापले अकाउंट डिटेल्स कन्फर्म करतील, ते पुन्हा तुमच्या फॉलोअर्समध्ये दिसू लागतील. अर्थात, यावेळी याच कारणामुळे फॉलोअर्स कमी होत असल्याचं कंपनीने अद्याप स्पष्टपणे सांगितलं नाहीये. या सगळ्यात नेटकऱ्यांच्या क्रिएटिव्हिटीला चांगलाच वाव मिळाला आहे. सोशल मीडियावर याबद्दल कित्येक मीम्स व्हायरल होत आहेत. यांपैकी कित्येक जण फॉलोअर्स कमी झाल्यामुळे दुःखी आहेत, तर फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइट्सवरील युजर्स ट्विटरकरांची खिल्ली उडवतानाही दिसून येत आहेत.

First published:

Tags: Twitter, Twitter account