'ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला', कारण...!

ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 4, 2018 09:53 AM IST

'ट्विटर अकाऊंटचा पासवर्ड तात्काळ बदला', कारण...!

04 मे : ट्विटर या सोशल नेटवर्किंग वेबसाइटने आपल्या सगळ्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्यासंदर्भातले प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. स्टोअर्ड पासवर्डच्या इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने ट्विटरने हे प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

आम्हाला इंटरनल लॉगमध्ये बग आढळल्याने आम्ही आमच्या युजर्सना पासवर्ड त्वरित बदलण्याचे आवाहन करतो आहोत. आम्ही यावर उपाय योजला आहे. आत्तापर्यंत एकाही ट्विटर अकाऊंटचा मिस युज झाल्याची तक्रार आमच्याकडे आलेली नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या युजर्सनी त्यांचा स्टोअर्ड पासवर्ड त्वरित बदलावा असे आम्ही सुचवत आहोत. असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात लिहलं आहे.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर 33 दशलक्ष युजर्स आहेत. त्यांच्या अकाऊंटच्या सुरक्षेच्या दृष्टीने ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. आधीच सोशल मीडियावर केंब्रिज अॅनालेटिका कंपनीने डाटा चोरल्याच्या प्रकरणावरून ग्राहकांमध्ये भीती आणि नाराजी आहे. त्यामुळे आता असं काही होण्याआधी तुम्ही तात्काळ तुमच्या ट्विटरचा पासवर्ड बदलून घ्या.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 4, 2018 09:52 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...