नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : ट्विटरवर तुमचेही खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे, कारण मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर लवकरच एक मोठे पाऊल उचलणार आहे. लाइव्ह मिंटच्या वृत्तानुसार, ट्विटर 11 डिसेंबरपासून ती खाती हटवणार आहे, जी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ निष्क्रिय होती. ट्विटरच्या या निर्णयाचा परिणाम एक वर्षापूर्वी खाते तयार करणार्यांर होणार आहे. त्यामुळं ट्विटरवर लॉग इन करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन करण्यात येत आहे.
या कारणामुळं उचलले जात आहे हे पाऊल
ट्विटरने यासंदर्भात दिलेल्या माहितीत, सार्वजनिक रूपांतरणासाठी असलेली वचनबद्धता लक्षात घेता निष्क्रिय खाती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, ट्विटरवर लोकांना अधिक अचूक आणि विश्वासार्ह माहिती मिळावी आणि या व्यासपीठावर त्यांचा विश्वास ठेवू शकतील यासाठी हा बदल करण्यात आला आहे. ट्विटरने पुढे म्हटले आहे की या प्रयत्नाच्या मदतीने आम्ही लोकांना लॉग इन करुन त्याचा वापर करण्यासाठी सक्रियपणे प्रोत्साहित करत आहोत.
वाचा-WhatsAppमध्ये झाला सर्वात मोठा बदल! आता आपोआप डिलीट होणार तुमचे मेसेज
Loading...Twitter is shutting down inactive accounts to free up usernames. Finally, my nemesis will be defeated https://t.co/iaR9m8pe26
— lex 🏳️🌈 (@lex577) November 26, 2019
वाचा-तुमच्या स्मार्टफोनचा विमा काढलात का? होणार नाही नुकसान
युझरना पाठवला जाणार अलर्ट
जर कोणी त्यांच्या ट्विटर खात्यावर सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉग इन केले नसेल तर ट्विटर देखील त्यांना हे पाऊल उचलण्यापूर्वी अलर्ट पाठवेल. ही प्रक्रिया त्वरित पार पाडली जाणार नाही, परंतु ती पूर्ण करण्यास काही महिने लागतील. प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी ट्विटरही नवीन वैशिष्ट्ये आणण्याची योजना आखत आहे.
वाचा-मृत्यूनंतर तुमच्या Google Account चं काय होणार?
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा