मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Twitter ने लाँन्चिंगच्या काही आठवड्यातच बंद केला वेरिफिकेशन प्रोग्राम, हे आहे कारण

Twitter ने लाँन्चिंगच्या काही आठवड्यातच बंद केला वेरिफिकेशन प्रोग्राम, हे आहे कारण

नवीन वेरिफिकेशन प्रोग्राम अधिक स्पष्टता आणेल आणि प्रामाणिक, उल्लेखनीय आणि सक्रीय अकाउंट्सलाच ब्लू टिक (Blue Tick) देईल.

नवीन वेरिफिकेशन प्रोग्राम अधिक स्पष्टता आणेल आणि प्रामाणिक, उल्लेखनीय आणि सक्रीय अकाउंट्सलाच ब्लू टिक (Blue Tick) देईल.

नवीन वेरिफिकेशन प्रोग्राम अधिक स्पष्टता आणेल आणि प्रामाणिक, उल्लेखनीय आणि सक्रीय अकाउंट्सलाच ब्लू टिक (Blue Tick) देईल.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 31 मे: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) 20 मे रोजी अधिकृतपणे दुसऱ्यांदा वेरिफिकेशनची सुरुवात केली होती. परंतु पुन्हा एकदा ट्विटरने हा वेरिफिकेशन प्रोग्राम बंद केला आहे. कंपनीने याबाबत बोलताना सांगितलं, की त्यांना वेरिफिकेशनसाठी अपेक्षेपेक्षा अधिक रिक्वेस्ट येत आहेत. नव्या रिक्वेस्ट स्वीकारण्याआधी, सध्या आलेल्या रिक्वेस्टचा आढावा घेण्यासाठी त्यांनी वेरिफिकेशन बंद केल्याचं म्हटलं आहे. भविष्यात पुन्हा एकदा वेरिफिकेशन ओपन केल्यास, युजर्स त्यासाठी रिक्वेस्ट पाठवू शकतात. ट्विटरने नोव्हेंबर 2017 मध्ये सार्वजनिक वेरिफिकेशन प्रोग्राम तीन वर्षांपूर्वी बंद केला होता. अनेकांना हे गोंधळ घालणारं वाटत असल्याने हे बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु काही विशेष प्रकरणांमध्ये ट्विटरने ब्लू टिक देणं सुरु ठेवलं होतं.

(वाचा - भारताच्या नव्या IT नियमांसाठी Facebook,Google सज्ज!वेबसाईट अपडेट करण्यास सुरुवात)

नवीन वेरिफिकेशन प्रोग्राम - ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वेरिफिकेशन प्रोग्राम अधिक स्पष्टता आणेल आणि प्रामाणिक, उल्लेखनीय आणि सक्रीय अकाउंट्सलाच ब्लू टिक (Blue Tick) देईल. वेरिफिकेशन मिळवण्यासाठी युजरचं अकाउंट सहा निकषांपैकी एकात फिट बसणं आवश्यक आहे. यात सरकार, कंपन्या, ब्रँड आणि संस्था, वृत्तसंस्था आणि पत्रकार, मनोरंजन, क्रिडा आणि गेमिंग आणि इतर प्रभावशाली व्यक्ती सामिल आहेत.

(वाचा - Twitter ची मोठी घोषणा; Blue Tick साठी तुम्हीही करू शकता अर्ज, असं करा अप्लाय)

दरम्यान, सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आयटी नियमांनुसार, फेसबुक, गुगल आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांनी आपली माहिती आयटी मंत्रालयासह शेअर केली आहे. परंतु ट्विटरने अद्यापही कोणतीही माहिती मंत्रालयाला दिलेली नाही.
First published:

Tags: Tech news, Twitter, Twitter account

पुढील बातम्या