नवी दिल्ली, 3 जून: मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) नुकतंच आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवं अपडेट जारी केलं आहे. या अपडेटचं नाव बर्डवॉच नोट्स (Birdwatch Notes) असं आहे. कंपनीने हे नवं अपडेट आयओएस अँड्रॉईड आणि डेस्कटॉप प्लॅटफॉर्मवर सुरू केलं आहे. यामुळे युजर्स फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीबाबत (Fact Check) जाणून घेऊ शकतात.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने अमेरिकेत काही निवडक युजर्ससाठी यावर्षी जानेवारीमध्ये प्रोग्राम पायलट वर्जन लाँच केलं होतं. कंपनीने बुधवारी एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अँड्रॉईड आणि आयओएसवर ट्विटर पेजवर बर्डवॉच नोट्स दिसेल, हे एखाद्या ट्विटवर एका कार्डच्या रुपात दिसेल, असं सांगण्यात आलं आहे.
सध्या हे फीचर केवळ पायलट पार्टिसिपेंट्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरचा फायदा सध्या त्याच युजर्सला मिळेल, जे पायलट बर्डवॉचमध्ये भाग घेत आहेत.
Hey there! Exciting news 🎉. Now, when you’re browsing Twitter on Android, iOS, or https://t.co/lEjTtR4BGM, you may see Tweets with Birdwatch notes. Notes will appear in a card on the Tweet. Right now, this feature is only visible to pilot participants. pic.twitter.com/dyMHgawLUl
— Birdwatch (@birdwatch) June 2, 2021
तसंच या नोट्स ट्विटरपासून वेगळ्या ठेवण्यात आल्या आहेत. बर्डवॉच फीचर तयार करताना खास लक्ष देण्यात आलं आहे, की यात असे संदर्भ जोडले जावेत, जे लोकांना अचूक माहिती देतील आणि त्यामुळे युजर्सचा विश्वासही संपादन होईल. एकूणच हे फीचर दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती काढून टाकण्यासाठी सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tech news, Twitter, Twitter account