नवी दिल्ली, 3 जून: सध्याचं युग सोशल मीडियाचं आहे, हे कोणी नाकारणार नाही. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर होणं हे अनेकांचं उद्दिष्ट असतं. त्यासाठी अकाउंट व्हेरिफाइड होणं अर्थात नावापुढे ब्लू टिक मिळवणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ट्विटर सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्याचा वापरही गेल्या काही वर्षांत खूप वाढला आहे. त्यातच ट्विटरची अकाउंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया तब्बल तीन वर्षांनी सुरू झाली आहे. 21 मे 2021 रोजी ही प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानंतर आलेल्या सर्व व्हेरिफिकेशन रिक्वेस्ट तपासण्यासाठी मध्येच अचानक काही दिवस ती बंद करण्यात आली होती. आता ती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
सार्वजनिक पातळीवर लोकांसाठी उपयुक्त असलेलं ट्विटर अकाउंट (Twitter Account) ऑथेंटिक अर्थात अधिकृत आहे, हे युजर्सना कळण्यासाठी व्हेरिफाइड ब्लू बॅजचा (Verified Blue Badge) उपयोग होतो. ऑथेंटिक, नोटेबल आणि अॅक्टिव्ह अर्थात अधिकृत, दखलपात्र आणि सक्रिय अकाउंट्स व्हेरिफाइड ब्लू बॅजसाठी अर्ज करण्याकरता पात्र ठरू शकतात. ट्विटरवर आपली अधिकृतता सिद्ध करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. प्रोफेशन अर्थात पेशा आणि कामाची दिशा यानुसार व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेत थोडाफार बदल असतो.
ब्लू बॅजसाठीची (Blue Badges) व्हेरिफिकेशन प्रक्रिया (Verification Process) समजून घेण्यासाठी काही मूलभूत घटक असावे लागतात. ट्विटरच्या म्हणण्यानुसार, 'नोटेबल' (Notable) अर्थात दखलपात्र अकाउंट्स एखाद्या प्रस्थापित संस्थेने किंवा कंपनीकडून उद्धृत केली गेलेली असावीत. 'ऑथेंटिक' (Authentic) म्हणजे अधिकृतता ठरवण्यासाठी अकाउंटवरील प्रोफाइल फोटो, वैध बायो (स्वतःची माहिती) आणि अन्य प्राथमिक माहिती पूर्ण भरलेली असली पाहिजे. तसंच 'अॅक्टिव्ह' (Active) म्हणजे संबंधित अकाउंट गेल्या सहा महिन्यांत सक्रिय असलं पाहिजे.
या प्रक्रियेला पात्र ठरण्यासाठी युजर्सनी ई-मेल अॅड्रेस आणि फोन नंबर कन्फर्म केलेला असला पाहिजे. तसंच, अर्ज करण्याआधीच्या सहा महिन्यांत ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन झालेलं असता कामा नये, असं ट्विटरने म्हटलं आहे.
We’re rolling in verification requests. So we gotta hit pause on accepting any more for now while we review the ones that have been submitted.
We’ll reopen requests soon! (we pinky swear) — Twitter Verified (@verified) May 28, 2021
सरकारी संस्था आणि सरकारी अधिकारी, वृत्तसंस्था आणि पत्रकार, कंपन्या, ब्रँड्स, संस्था-संघटना, मनोरंजनविषयक संस्था आणि व्यक्ती, क्रीडा प्रकारांच्या टीम्स, संस्था आणि खेळाडू, कार्यकर्ते, ऑर्गनायझर्स, प्रभावी व्यक्तिमत्त्वं आदींना ट्विटर व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करता येणार आहे. तसंच, शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातली व्यक्तिमत्त्वं आणि धार्मिक/आध्यात्मिक क्षेत्रातले गुरू आदींनाही यासाठी अर्ज करण्याची तरतूद प्रथमच करण्यात आली आहे.
वरचे मूलभूत मुद्दे/निकष/अटी यांमध्ये तुमचं ट्विटर अकाउंट पात्र ठरत असेल, तर तुम्ही तुमच्या अकाउंट सेटिंग्जमध्ये (Account Settings) अकाउंट व्हेरिफिकेशन हा पर्याय दिसतो का ते पाहिलं पाहिजे. तो पर्याय दिसल्यावर त्यावर क्लिक करावं. तुम्ही ज्यासाठी पात्र ठरता ती कॅटेगरी निवडा, सरकारी ओळखपत्र सादर करा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर एक आठवडा ते 30 दिवसांत तुम्हाला त्यावर उत्तर मिळेल. त्यासाठीचा ई-मेल तुम्हाला प्राप्त होईल. दरम्यान, तुमचं अकाउंट व्हेरिफाइड झालं, तर तुमच्या अकाउंटवर नावापुढे ब्लू टिक आपोआप दिसू लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Twitter, Twitter account