Home /News /technology /

नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी, कायदेशीर संरक्षण संपुष्टात - रविशंकर प्रसाद

नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी, कायदेशीर संरक्षण संपुष्टात - रविशंकर प्रसाद

रविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं.

  नवी दिल्ली, 17 जून : भारतात मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला (Twitter) दिलेलं कायदेशीर संरक्षण (Harbour Provision) आता संपलं आहे. केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी एकामागून एक ट्विट करत या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. 'ट्विटरवर भारतात कायदेशीर संरक्षणाचा हक्क आहे की नाही याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु 26 मे पासून अस्तित्त्वात आलेल्या नवीन आयटी कायद्यांचं पालन करण्यात ट्विटर अपयशी ठरलं आहे.' केंद्र सरकारने ट्विटरचं कायदेशीर संरक्षण संपुष्टात आणण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत. सरकारने केलेल्या नियमांचं पालन न केल्यामुळे हे कायदेशीर संरक्षण आपोआपच 25 मे रोजी संपलं आहे. आयटी कायद्याच्या कलम 79 नुसार ट्विटरला हे कायदेशीर संरक्षण मिळतं. या कलमानुसार ट्विटरला कोणतीही कायदेशीर कारवाई, मानहानी किंवा दंड करण्यापासून सूट दिली आहे. परंतु आता कायदेशीर संरक्षण संपताच ट्विटरविरुद्ध पहिला गुन्हा उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये दाखल झाला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, ट्विटरला सरकारने अनेक संधी दिल्या परंतु ट्विटरने प्रत्येक वेळी नियमांकडे दुर्लक्ष केलं. भारतीय संस्कृती आपल्या मोठ्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत राहिली आहे. सोशल मीडियावर एक लहानशी चूकही मोठं कारण ठरू शकते. फेक न्यूजचा मोठा धोका आहे. यावर कंट्रोल करणं आणि रोखणं हा नव्या आयटी नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण नियम होतो, परंतु याचं ट्विटरने पालन केलं नाही.

  (वाचा - Twitter वर अनेक युजर्सचे फॉलोवर्स अचानक कमी होऊ लागले; कंपनीनेच सांगितलं कारण)

  (वाचा - Twitter नंतर आता Instagram विरोधातही कारवाई होणार? FIR दाखल, वाचा काय आहे प्रकरण)

  काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसांनी लोनी भागात अब्दुल समद नावाच्या एका वृद्धाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद पोलिसांनी FIR दाखल केला होता. या व्हिडीओमध्ये वृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याचं दिसत होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्धाने एका व्यक्तीला ताबीज दिले होते, त्याचा फायदा न झाल्याने, आरोपीने वृद्धाला मारहाण केली होती. ट्विटरने या व्हिडीओला मॅन्युप्युलेटेड मीडिया टॅग दिला नव्हता.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Tech news, Twitter

  पुढील बातम्या