टि्वट करू शकतात आता 280 शब्दात, 'हे' पण झाले नवे बदल !

टि्वट करू शकतात आता 280 शब्दात, 'हे' पण झाले नवे बदल !

. आजपासून टि्वटची शब्द मर्यादा दुपट्टीने अर्थात 280 शब्द करण्यात आलीये.

  • Share this:

08 नोव्हेंबर : 140 शब्द मर्यादा घेऊन अवघ्या जगाला टीवटीव करायला वेड लावणाऱ्या टि्वटरने आता आपली शब्द मर्यादा ओलांडलीये. आजपासून टि्वटची शब्द मर्यादा दुपट्टीने अर्थात 280 शब्द करण्यात आलीये.

परंतु, चीन, जपान आणि कोरियामध्ये 140 शब्दांची मर्यादा कायम ठेवण्यात आलीये. कारण तिथे कमी शब्दांचा वापर होत असल्यामुळे हा निर्णय कायम ठेवला आहे.

इंग्रजी भाषेत 9% टक्के टि्वट्स हे 140 शब्दात लिहिले जातात. यात वापरकर्ते 140 शब्दांत आपलं टि्वट पूर्ण करू शकत नाही. आता 280 शब्द मर्यादा केल्यामुळे वापरकर्त्यांना शब्द वाढवता येतील असा विश्वास टि्वटरने व्यक्त केलाय.

हे आहेत नवीन बदल

यासोबत टि्वटरने अजून काही बदल केले आहे. यामध्ये वापरकर्ता मल्टी पार्ट टि्वट, टेक्स्ट ब्लाॅक चं स्क्रीनशाॅट असे टि्वट करू शकतो. जेव्हा तुम्ही टि्वट टाईप करणार तेव्हा उजव्या कोपऱ्यात एक सर्कल दिसेल, जेव्हा तुमचे 280 शब्द पूर्ण होतील तेव्हा हा सर्कल डार्क होईल. म्हणजे तुमची शब्द मर्यादा इथं संपली आहे.

First Published: Nov 8, 2017 05:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading