ट्विटरने डिलिट केले 90 हजार 'फेक' अकाऊंट, बरेचसे अकाऊंट मुलींच्या नावावर !

ट्विटरने डिलिट केले 90 हजार 'फेक' अकाऊंट, बरेचसे अकाऊंट मुलींच्या नावावर !

ट्विटरवर हल्ली अश्लील कंटेट खूप मोठ्या प्रमाणात जनरेट केला जातो. या कंटेंटला चाप बसवायचा विडा ट्विटरने उचलला आहे. हा सगळा कंटेंट फेक अकाऊंट्सवरून जनरेट होतो.

  • Share this:

19जुलै: सध्या सगळ्या जगावर सोशल मीडियाचा 'फिव्हर' चढलाय.  प्रत्येकाला जगाशी कनेक्ट करण्यासाठी फेसबुक ट्विटरून 'टिवटिवाट' करायला आवडतं. पण आता या टिवटिवाटावर चाप बसणार आहे. कारण ट्विटरने नुकतेच 90,000 अकाऊंट डिलिट केले आहेत.

घाबरायचे काही कारण नाही कारण ट्विटर फक्त फेक अकाऊंटच डिलिट करतं आहे. ट्विटरवर हल्ली अश्लील कंटेट खूप मोठ्या प्रमाणात जनरेट केला जातो. या कंटेंटला चाप बसवायचा विडा ट्विटरने उचलला आहे. हा सगळा कंटेंट फेक अकाऊंट्सवरून जनरेट होतो. त्यातले बरेचसे फेक अकाऊंट्स मुलींच्या नावावर आहेत, आश्चर्याची बाब म्हणजे या अकाऊंटसला आणि कंटेंटला 3 कोटीहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.ऑनलाईन सेक्स ऑफर करणारा एक कॅम्पेनच  या अकाऊंट्स वरून चालवला जात असल्याचा सुगावा बाल्टीमोरच्या 'झिरोफॉक्स' या सुरक्षा कंपनीला लागला होता.त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका रिपोर्टनुसार अशा कंटेटवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याला मर्यादा घालण्यासाठी अनेक देशांनी सायबर सेना तयार केल्या आहेत.

First published: July 19, 2017, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading