• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Twitter चे CEO जॅक डोर्सींचे अकाउंट हॅक, केले आक्षेपार्ह ट्विट

Twitter चे CEO जॅक डोर्सींचे अकाउंट हॅक, केले आक्षेपार्ह ट्विट

ट्विटरच्या संस्थापकांचे अकाउंट सेफ नसेल तर युजर्सचं काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांचे अकाउंट शुक्रवारी रात्री हॅक झालं होतं. त्यानंतर हॅकरनं आक्षेपार्ह ट्विट केले. यामध्ये वंशभेदी टीकेसह ट्विटरचं मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती. अकाउंट हॅक झाल्याचं समजताच सर्व ट्वीट डिलीट करण्यात आली. हॅकर्सच्या एका गटाने जर्मनीतील नाझींच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. ट्विटरच्या एका प्रवक्त्यांनी सांगितलं की, जॅक डोर्सींचं अकाउंट हॅक झालं आहे. आम्ही याची चौकशी करत आहोत. जॅक डोर्सींच्या ट्विटरवर काही ट्विट अर्ध्या तासाहून अधिक वेळ तसेच दिसत होते. त्यानंतर ट्विटरच्या टेक टीमने त्यांचे अकाउंट रिकव्हर केलं. दरम्यान ट्विटरच्या युजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. टू स्टेप व्हेरिफिकेसन ट्विटरच्या संस्थापकांचं अकाउंट सुरक्षित ठेवू शकत नाही तर युजर्सचं काय. चकलिंग स्क्वाडने आतापर्यंत जगभरातील अनेक प्रसिद्ध लोकांचं खातं हॅक केल्याचा दावा केला आहे. नुकतंच या ग्रुपनं ब्यूटी व्हीलॉगर जेम्स चार्ल्स हिचं खातंही हॅक केलं होतं. मुंबईतील 'नो पार्किंग' झोनची मनसेकडून पोलखोल, पाहा SPECIAL REPORT
  Published by:Suraj Yadav
  First published: