मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

'आवडीचं काम करून पैसे कमवा'; Twitter देतंय हजारो रुपये जिंकण्याची संधी

'आवडीचं काम करून पैसे कमवा'; Twitter देतंय हजारो रुपये जिंकण्याची संधी

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी बग बाउंटी कॉन्टेस्टची सुरुवात केली आहे.

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी बग बाउंटी कॉन्टेस्टची सुरुवात केली आहे.

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी बग बाउंटी कॉन्टेस्टची सुरुवात केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट : मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने (Twitter) आपला प्लॅटफॉर्म अधिक सुरक्षित करण्यासाठी बग बाउंटी कॉन्टेस्टची सुरुवात केली आहे. या कॉन्टेस्टमध्ये 3500 डॉलर म्हणजे जवळपास 2,60,327 रुपयांचं बक्षिस दिलं जाईल. या कॉन्टेस्टचा मुख्य उद्देश सिक्योरिटी रिसर्चर्सद्वारा ट्विटरच्या अल्गोरिदममध्ये असणाऱ्या त्रुटींची माहिती काढणं असा आहे. ट्विटरवर एक चूक शोधून हजारो रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

ट्विटरवर कोणत्याही प्रकारच्या त्रुटीची ओळख करण्यासाठी कंपनीने आपलं अल्गोरिदम पब्लिक केलं आहे. या ओपन अल्गोरिदममुळे संभाव्य तोटे ओळखण्यास मदत होणार आहे. यासाठी संबंधित कम्युनिटीला एकत्र करुन, त्यांना प्रोत्साहित करुन संभाव्य त्रुटींमध्ये बदल करण्यासाठी अल्गोरिदम पब्लिक करण्यात आलं आहेत.

रिसर्च आणि हॅकर कम्युनिटीद्वारे जनतेच्या सुरक्षेसाठी त्रुटींची ओळख करुन, त्या कमी करण्यासाठी मदत होणार आहे. ट्विटरवर येणाऱ्या समस्या कमी करणं हाच या कॉन्टेस्टचा प्रमुख उद्देश आहे. ट्विटर युजर्स ट्विटरवर एखादी त्रुटी आढळल्या, ती समोर आणू शकतात. यातील बग बाउंटी कॉन्टेस्टच्या विजेत्यांची नावं 8 ऑगस्ट रोजी ट्विटरद्वारा आयोजित एका वर्कशॉपमध्ये जारी केली जाणार आहेत. विजेत्यांना HackerOne कडून कॅश प्राइज दिलं जाईल. यात पहिल्या विजेत्याला 3,500 डॉलर, दुसऱ्या विजेत्याला 1,000 डॉलर, तिसऱ्या विजेत्याला 500 डॉलर, मोस्ट इनोव्हेटिव्ह विजेत्याला 1000 डॉलर दिले जाणार आहेत. ट्विटरच्या या कॉन्टेस्टमध्ये 6 ऑगस्टपर्यंत भाग घेता येऊ शकतो.

Microsoft मध्ये सांगितली मोठी त्रुटी, कंपनीने 20 वर्षीय तरुणीला दिले 22 लाख रुपये

बग बाउंटी प्रोग्राम मोठ्या कंपन्यांकडून ठेवलं जातं. याअतंर्गत मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट किंवा दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर त्रुटी रिपोर्ट केल्यानंतर बक्षिस दिलं जातं. यात एखाद्या बग बदद्ल किंवा त्रुटीबदद्ल कंपनीला सांगावं लागतं आणि त्याचे डिटेल्स द्यावे लागतात. त्यानंतर कंपनी ठरवते की ती त्रुटी किती गंभीर आहे. एखाद्याने सांगितलेली त्रुटी किंवा बगची गंभीरता पाहून बक्षिसाची रक्कम ठरवली जाते.

भारतात यापूर्वीही फेसबुक आणि इतर कंपन्यांकडून लोकांना बक्षिस दिलं गेलं आहे. फेसबुकवर बग शोधून बक्षिस मिळवणाऱ्यांमध्ये भारतीय डेव्हलपर किंवा हॅकर्स सर्वात पुढे आहेत.

First published:

Tags: Tech news, Twitter, Twitter account