नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी : जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरचा (Twitter) वापर करत असाल आणि तुमचे फॉलोवर्स अधिक असतील, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्वीटरवर आता इन्स्टाग्राम (Instagram), यूट्यूबप्रमाणेच (YouTube) युजर्सला पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे. कंपनीने आपल्या युजर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. ट्वीटरने दोन नव्या फीचर्सची माहिती दिली आहे. याच नव्या फीचर्सद्वारे युजर्सला पैसे कमावण्याची संधी मिळेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आता युजर्स आपल्या फॉलोवर्सला अतिरिक्त कंटेंट दाखवण्याची आणि समूहावर आधारित विशेष कंटेंट तयार करण्याची आणि समूहात समाविष्ट करण्याची संधी असेल.
दर महिन्याला किती होईल कमाई?
इंटरनॅशनल वेबसाईट The Verge नुसार, यात एक सुपर फॉलो पेमेंट फीचर असेल, ज्यात युजर्स आपल्या फॉलोवर्सला अधिक कंटेंटपर्यंत पोहचवण्यासाठी पैसे घेऊ शकतात. यात बोनस ट्वीट, कम्युनिटी ग्रुपपर्यंत पोहच, न्यूजलेटरची सदस्यता सामिल आहे. ट्वीटरने स्क्रिनशॉट शेअर करत, यात कशाप्रमारे युजर्स दर महिन्याला 4.99 डॉलर कमावू शकतात हे दाखवलं आहे. ट्वीटर आपल्या युजर्सला आपल्या फॅन्सद्वारे कमाई करण्याची संधी देत आहेत. परंतु या सुविधा कधीपर्यंत लाँच केल्या जातील, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
फेसबुक, यूट्यूबकडूनही पेमेंट सर्विस लाँच -
युजर्ससाठी सध्या डायरेक्ट पेमेंट टूल अतिशय महत्त्वपूर्ण ठरलं आहे. फेसबुकपासून यूट्यूबपर्यंत इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेही अशाप्रकारची पेमेंट सर्विस लाँच केली आहे. आता यात ट्वीटरनेही पाऊल ठेवलं आहे. ट्वीटरने आपल्या नव्या फीचरचं नाव कम्युनिटी ठेवलं आहे. हे फेसबुक ग्रुपप्रमाणे असेल. यात युजर्स त्यांना हवा तसा ग्रुप बनवू शकतात. ट्वीटर युजर्सला त्यांच्या पसंतीनुसार, अनेक विषयांवरील ट्वीट दाखवेल.