नवी दिल्ली, 25 एप्रिल : टाटा मोटर्स (Tata Motors), हुंदाई (Hyundai) आणि मारुती (Maruti) या वाहन कंपन्याच्या नवीन कार्समध्ये टर्बोचार्ज्ड इंजिनचा (Turbo Charged Engine) वापर करण्यात येत आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) अशा दोन्ही पर्यायांमध्ये हे टर्बोचार्ज्ड इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन नॅचरली एस्पिरेटेड इंजिनपेक्षा अधिक पॉवरफुल असतं. नॅचरली एस्पिरेटेड इंजिन असलेल्या कार्स वापरण्याचा अनुभव असणाऱ्या लोकांना टर्बोचार्ज्ड इंजिन योग्य प्रकारे वापरण्याची पद्धत माहिती नसते. हे इंजिन योग्य प्रकारे वापरल्यास कारचं मायलेज वाढवणं शक्य होतं.
जोरात ब्रेक लावू नका -
अनेकदा लोक स्पीड ब्रेकर किंवा ट्रॅफिक सिग्नलला वेगात असलेल्या कारला (Car) अचानक जोरात ब्रेक लावून थांबवतात. असं केल्याने बरंच इंधन वाया जातं. ब्रेक लावताना कारचा एक्सिलेटर सोडून देणं आवश्यक असतं. त्यामुळे कारचा वेग आपोआप कमी होईल आणि त्यानंतर ब्रेकचा वापर करा. नवीन कार्समध्ये फ्युएल-इंजेक्शन (Fuel-Injection) तंत्रज्ञान वापरलं जात आहे, यामुळे आपोआप इंजिन बंद होतं.
गिअर्स घाईत बदलू नका -
टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्ये गिअर शिफ्टिंग (Gear Shifting) दरम्यान टॉर्क कमी वापरला गेला पाहिजे. 2000 2,000 RPM च्या रेव्ह रेंजवर तो त्वरेनं शिफ्ट केला पाहिजे. टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनमध्ये घाईत गिअर्स बदलू नका, असं केल्यानं कारचं इंजिन वेगाने पळत नाही आणि आपल्या कारचं जास्त इंधन खर्च होईल. कारच्या मायलेजवरही याचा परिणाम होतो.
टॉर्कवर लक्ष द्या -
टर्बोचार्ज्ड इंजिनची कार चालवत असताना टॉर्क ग्राफवर (Torque Graph) लक्ष देणं आवश्यक आहे. कार सुरू करण्यासाठी जास्त टॉर्कची वाट पाहण्याची गरज नसते. यामध्ये तुम्ही 2,000 RPM वरदेखील चांगला वेग घेऊ शकता. यामुळे तुमच्या कारला चांगलं मायलेज मिळेल.
कार एकाच वेगानं चालवा -
तुम्ही महामार्गावर (Highway)टर्बोचार्ज्ड इंजिन कार चालवत असाल तर क्लच, गिअर शिफ्टिंग आणि थ्रॉटल इनपुट यांचा वारंवार वापरू नका. कार हायर गिअरमध्ये असेल आणि इंजिनच्या रेव्ह्ज स्थिर असतील याची काळजी घ्या. महामार्गावर एकाच वेगाने कार चालवा आणि क्रुज कंट्रोलचा वापर करा. यामुळे कारला चांगलं मायलेज मिळेल.
वेग कमी करताना गिअर डाउन करा -
टर्बोचार्ज्ड इंजिनमध्ये वेग कमी करण्यासाठी, सरळ ब्रेकचा वापर न करता आधी गिअर डाउनशिफ्ट करा. असं केल्याने थ्रोटल ब्लॉक केलं जातं आणि चालू गिअर खालच्या रेव्ह्जशी जुळतात. तुम्ही क्लचचादेखील वापरू शकता ज्यामुळे गिअर एक शिफ्टनं खाली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car