Truecaller वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? तुमच्याकडून परस्पर पाठवला गेलाय SMS!

मंगळवारची सकाळ Truecaller वापरणाऱ्यांसाठी धक्का देणारी ठरली.

News18 Lokmat | Updated On: Jul 30, 2019 08:42 PM IST

Truecaller वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचली का? तुमच्याकडून परस्पर पाठवला गेलाय SMS!

नवी दिल्ली, 30 जुलै: मंगळवारची सकाळ Truecaller वापरणाऱ्यांसाठी धक्का देणारी ठरली. अज्ञात व्यक्तींकडून येणारे फोन समजावेत किंवा त्यांचे नाव समजावे यासाठी सर्वात लोकप्रिय असलेल्या Truecallerद्वारे मोठा गोंधळ घातला. या अॅपद्वारे युझरकडून अपोआप मेसेज पाठवले जात होते. विशेष म्हणजे हा मेसेज तुमच्या मित्रांना किंवा कोणा नातेवाईकांना नाही तर ICICI बँकेला जात होता.

Truecallerद्वारे ICICI बँकेच्या UPI सर्व्हिससाठी नोंदणीचा मेसेज आपोआप परवानगी न घेता पाठवला जात होता. विशेष म्हणजे अशा प्रकारचा मेसेज पाठवला जात आहे याची माहिती संबंधित युझर्सना देखील नव्हती. धक्कादायक म्हणजे ICICI बँकेच्या UPI सेवेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी अॅपकडून परवानगी देखील घेण्यात आली नाही. आता तुम्हाला वाटेल की Truecaller वापरणाऱ्यांपैकी ज्यांचे ICICI बँकेत खाते आहे केवळ त्यांनाच असा मेसेज जात असेल. पण तसे नाही. प्रत्यक्षात ज्यांचे ICICI बँकेत खाते नाही त्यांच्याकडून देखील बँकेला मेसेज पाठवले गेले. अॅपकडून पाठवण्यात आलेल्या या एका मेसेजमुळे बँकेने ज्यांची खाती होती त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण ज्यांचे बँकेत खाते नाही त्यांची नोंदणी प्रक्रिया सुरु झाली नाही. ही बातमी बाहेर पडल्यानंतर युझर्सनी सोशल मीडियावरून तक्रार करण्यास सुरूवात केली. काही युझर्सना अशी ही भीती वाटली की त्यांच्या खात्यातील पैसे ट्रान्सफर झाले.

Truecaller दिले स्पष्टीकरण...

अॅप अपडेट झाल्यानंतर त्यात एक बग असल्याचे आमच्या लक्षात आले. अपडेट व्हर्जनमध्ये पेमेंट फिचरमध्ये एक बग निर्माण झाला. यामुळे युझर्सकडून ऑटोमॅटिक रजिस्ट्रेशन सुरू झाले. ही गोष्ट लक्षात येताच तो तातडीने काढून टाकण्यात आला आहे. अॅपचे संबंधित व्हर्जन मागे घेण्यात आले आहे. यापुढे कोणत्याही युझर्सला याचा त्रास होणार नाही.

'ती' राष्ट्रवादीची ऐतिहासिक चूक, जितेंद्र आव्हाडांची कबुली पाहा हा VIDEO

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 30, 2019 08:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...