Home /News /technology /

खराब झालेल्या इयरफोन्सचा 'असाही' करता येतो वापर... तुम्ही विचारही केला नसेल!

खराब झालेल्या इयरफोन्सचा 'असाही' करता येतो वापर... तुम्ही विचारही केला नसेल!

सध्या वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्सची (Wireless Bluetooth Earphone) चलती आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत इअरबड्स (Earbuds) प्रकारचे इअरफोन्सही अनेक कंपन्यांनी सादर केले आहेत.

मुंबई, 7 सप्टेंबर : सध्या वायरलेस ब्लूटूथ इयरफोन्सची (Wireless Bluetooth Earphone) चलती आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांत इअरबड्स (Earbuds) प्रकारचे इअरफोन्सही अनेक कंपन्यांनी सादर केले आहेत. वायरलेस ब्लूटूथ हेडसेट वापरायला एकदम छान आणि दिसायला एकदम भारी असले, तरी त्यांची किंमतही तितकीच भारी असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना पूर्वीचे वायर्ड इयरफोन्स वापरणंच परवडतं. आता वायरलेस इयरफोन्स मोठ्या प्रमाणावर दिसू लागले असले, तरी अगदी आताआतापर्यंत बहुतांश जण वायर्ड इयरफोन्सच वापरत होते. हे इयरफोन्स जपून वापरावे लागतात. कारण त्यांची वायर कुठे अडकली, जास्त जोरात ओढली गेली किंवा कापली गेली, तर ते नादुरुस्त होतात. आणि ते दुरुस्त करून मिळत नाहीत. अगदी जपून वापरले तरीही काही महिन्यांनी ते इयरफोन्स खराब होतातच. हे हेडफोन्स तुलनेने स्वस्त असल्याने नवीन घेणं परवडतं; पण मग जुन्या इयरफोन्सचं काय करायचं असा प्रश्न पडतो. जुने इयरफोन्स (Old Eraphones) अगदीच कचऱ्यात टाकून देणंही जीवावर येतं; पण त्यांचा काही वेगळ्या कारणांसाठी उपयोग करता आला तर? असा उपयोग करणं शक्य आहे. खराब झालेल्या वायर्ड इयरफोन्सचा (Wired Earphones) कसा उपयोग करून घेता येऊ शकतो. फोटो अडकवण्यासाठी : इयरफोनच्या वायरवर रंगीबेरंगी टेप्स लावून ती वायर भिंतीवर कोणत्याही आकारात चिकटवावी. कपड्यांमध्ये लावल्या जाणाऱ्या क्लिपच्या साह्याने या वायरवर तुम्ही फोटो टांगू शकता. भिंतीवर आपल्या जुन्या आठवणींशी संबंधित फोटो अडकवून ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. सजवण्यासाठी : घरातला फ्लॉवर पॉट (Flower Pot) नवा असतो तेव्हा एकदम आकर्षक दिसतो. काही दिवसांनी मात्र तो जुनाट वाटायला लागतो. अशा वेळी तुमच्याकडे जुने इयरफोन्स असतील, तर त्याच्या वायरला धागे, टेप, रिबन आदींच्या साह्याने सजवून फ्लॉवर पॉटच्या चारही बाजूने गुंडाळावं. म्हणजे नेहमीचाच फ्लॉवर पॉट एकदम नवा वाटू लागेल. कानातल्या रिंग्ज : जुन्या इयरफोनच्या वायरला सुंदर रेशमी धागे लपेटून इयर रिंग्ज (Ear Rings) तयार करता येऊ शकतात. त्या धाग्यांसह बीड्सचाही वापर केला, तर स्टायलिश इयर रिंग्ज किंवा हेडबँडही तयार करता येऊ शकतो. ज्वेलरी लटकवण्यासाठी : जुन्या इयरफोनची वायर सजवावी किंवा तशीच एखाद्या जुन्या फ्रेममध्ये वळणं-वळणं करून लावावी. त्या वायरवर इयर रिंग्ज लटकवून ठेवता येऊ शकतात. तसंच, सनग्लासेस अडकवून ठेवण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो. की-चेन : इयरफोनच्या वायरला एकेक गाठी मारून ती विणून घ्यावी. त्यात मध्ये-मध्ये बीड्सही (Beads) घालता येऊ शकतात. त्याद्वारे एक सुंदर की-चेन बनवता येऊ शकते. तुमची कल्पनाशक्ती लढवून अशा आणखी काही कल्पनाही तुम्ही प्रत्यक्षात आणू शकता, जेणेकरून जुन्या इयरफोन्सचा चांगला उपयोग करता येऊ शकेल. खराब इयरफोन्स किंवा त्यापासून तयार केलेल्या वस्तू खराब झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक कचरा स्वीकारणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांकडेच द्याव्यात. नेहमीच्या कचरापेटीत त्या टाकू नयेत.
First published:

पुढील बातम्या