मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsAppवरील अनावश्यक मेसेजच्या नोटिफिकेशनपासून मुक्ती; सेटिंग्जमध्ये असे करा बदल

WhatsAppवरील अनावश्यक मेसेजच्या नोटिफिकेशनपासून मुक्ती; सेटिंग्जमध्ये असे करा बदल

WhatsApp Pay सर्व्हिस नेमकं आहे काय? - WhatsApp Pay चं भारतात गेल्या दोन वर्षांपासून बीटा टेस्टिंग सुरू आहे. पेमेंट प्रक्रियेत येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अद्याप अधिकृतपणे लाँच करण्यात आलेलं नाही. पण आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप पे भारतात लाँच होणार आहे. ही सर्व्हिस यूपीआयवर (UPI)आधारित आहे. ही सर्व्हिस सुरू झाल्यानंतर युजर्सला कधीही आणि कुठेही पैसे पाठवता येणार आहेत.

कामात असताना व्हॉट्सॲप (WhatsApp) मेसेजचं नोटिफिकेशन येतं आणि आपण हातालं काम बाजूला करुन आधी व्हॉट्सॲप बघतो. पण नंतर समजतं की हा मेसेज आत्ता महत्वाचा नव्हता. अशा नको त्या नोटिफिकेशनपासून तुम्हाला मुक्तता मिळणार आहे. व्हॉट्सॲपने तुमच्यासाठी एक खास फिचर आणलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 19 ऑक्टोबर: व्हॉट्सॲपवर (WhatsApp) बर्‍याच वेळा नको असलेल्या मेसेजच्या नोटिफिकेशनमुळे आपल्याला बराच त्रास सहन करावा लागतो. हे बऱ्याच वेळा ग्रूप चॅट बाबतीत घडते. ज्यात एखादी व्यक्ती व्हॉट्सॲपवर सतत मेसेज पाठवत राहते आणि आपल्या फोनवर वारंवार त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतात. या गोष्टी लक्षात घेऊन व्हॉट्सॲपवर आता 'Mute' चा ऑप्शन देण्यात आलेला आहे. व्हॉट्सॲपवर आतापर्यंत म्यूट हा ऑप्शन फक्त एका वर्षासाठी उपलब्ध होता परंतु तो आता 'Always mute' हा पर्याय आपल्यासाठी उपलब्ध केलेला आहे. ज्यामध्ये हे तुम्हाला आता अनावश्यक मेसेज नोटिफिकेशनपासून कायमची मुक्तता मिळणार आहे. ऑलवेज म्यूट व्यतिरिक्त 8 तास आणि एक आठवड्यासाठी आपल्याला चॅट म्यूट करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. हे नवीन फिचर अँड्रॉइड आणि आयओएसमध्ये कसं वापरायचं ते जाणून घेऊया. अँड्रॉइड फोनमध्ये हे फिचर कसं अक्टिव्हेट करावं? Always mute ऑप्शन वापरण्यासाठी युझर्सना त्यांचे व्हॉट्सॲप उघडावे लागणार आहे. त्यानंतर जे चॅट किंवा ग्रूप म्यूट करायचं आहे तो उघडायचं. उजव्या बाजूच्या वरच्या तीन टिपक्यांवर टॅप करा आणि म्यूट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यात तुम्हाला 3 पर्याय दिसतील यात आठ तास, एक आठवडा आणि ऑलवेज म्यूट यांचा समावेश आहे. ऑलवेज म्यूटवर ओके करून निवडलेला चॅट तुम्ही कायमच म्यूट करुन ठेवू शकता. आयओएस फोनमध्ये फिचर कसं अक्टिव्हेट करावं? तुम्हाला म्यूट करण्याची इच्छा असलेले चॅट किंवा ग्रुप प्रथम उघडा. त्यांच्या नावावर टॅप करा येथे तुम्हाला म्यूटचा पर्याय दिसेल‌. तेथे म्यूट वर टॅप केल्यानंतर वापरकर्त्यांना आठ तास, एक आठवडा आणि ऑलवेज म्यूट असे तीन पर्याय दिसतील. या पर्यायामध्ये ऑलवेज म्यूट पर्याय निवडून वापरकर्ते हवे असलेलं चॅट किंवा ग्रुप कायमचं म्यूट करू शकतात.
First published:

Tags: Whatsapp

पुढील बातम्या