Home /News /technology /

तुमच्या आवडत्या YouTube वर सर्वांत पहिला कोणता Video केला होता अपलोड?, पुन्हा होतोय Viral

तुमच्या आवडत्या YouTube वर सर्वांत पहिला कोणता Video केला होता अपलोड?, पुन्हा होतोय Viral

अब्जावधी लोकांच्या ज्ञानाची भूक भागवणाऱ्या व मनोरंजनाचे सरस माध्यम असलेल्या युट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी अपलोड केला गेला आणि तो कुणी व कुठे अपलोड केला याची तुम्हाला माहिती आहे का?

नवी दिल्ली, 13 जून: दैनंदिन जीवनात तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती पाहिजे असेल किंवा कुठलीही अडचण उद्भवली की, ती सोडवण्यासाठी त्वरित मोबाईल हाती येतो आणि गुगल (Google) किंवा युट्यूबवर (You Tube) जाऊन त्याचे निराकरण केले जाते. जगभरात दररोज कोट्यवधी लोक असंख्य व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करतात. अब्जावधी लोकांच्या ज्ञानाची भूक भागवणाऱ्या व मनोरंजनाचे सरस माध्यम असलेल्या युट्यूबवर पहिला व्हिडिओ कधी अपलोड केला गेला आणि तो कुणी व कुठे अपलोड केला याची तुम्हाला माहिती आहे का? बहुतांश लोकांकडे या प्रश्नांचं उत्तर नाही; असंच असेल; पण सध्या युट्यूबवरील तो पहिला व्हिडिओ पुन्हा एकदा प्रचंड व्हायरल होत आहे. ‘झी न्यूज हिंदी’ने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, त्यांच्या जगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. एकसारखी आवड, छंद असणाऱ्या अब्जाधीश लोकांना युट्यूबने त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकत्र आणले. 15 पेक्षा अधिक वर्षांपासून युट्यूबवर लाखो व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. प्रत्येक क्षेत्राशी संबंधित व्हिडिओ येथे तुम्हाला मिळतो. ज्याला वाटेल ती व्यक्ती यावर व्हिडिओ अपलोड करू शकते. युट्यूबची सुरूवात ज्या व्हिडिओपासून झाली तोच आता युट्यूबच्या अधिकृत इन्स्टाग्राम (Instagram) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एका शॉर्ट व्हिडिओपासून (Short Video) आम्ही सुरूवात केली होती.’ असं कॅप्शनही या व्हिडिओवर देण्यात आले आहे.
जवळपास 17 वर्षांपूर्वी युट्यूबचे को-फाउंडर (Co-Founder) जावेद करीम (Javed Karim) यांनीच 19 सेकंदाचा पहिला व्हिडिओ सॅन डिअॅगो प्राणिसंग्रहायलासमोर (San Diego Zoo) उभं राहून बनवला होता. यात जावेद करीम ‘ओके आपण आता हत्तींसमोर उभे आहोत. यांच्याबद्दल वैशिष्ट्यपूर्ण बाब सांगायची झाल्यास त्यांची सोंड बरीच लांब आहे आणि ती चांगलीही दिसत आहे. मला केवळ एवढंच बोलायचं आहे… ’ असं म्हणताना दिसतात. करीम यांच्यामार्फत युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेला एकमेव व्हिडिओ असून त्याला आतापर्यंत 235 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहून युजर आश्चर्यचकित युट्यूबची सुरूवात नेमकी कशी झाली? याबद्दल माहिती देणारे व्हिडिओ अनेक ठिकाणी मिळतील. पण वेबसाइटच्या इन्स्टाग्राम हँडलवर 17 वर्षांपूर्वीचा जुना व्हिडिओ पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. ‘आपण या व्हिडिओची खात्री केली असून, तो खरा आहे…’ असं एका यूजरने म्हटलंय. तर, ‘युट्यूबमुळे असंख्य लोकांचं जीवन बदलून टाकलं’, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली. युट्यूबची ही पोस्ट 1,68,236 वेळा पाहिली गेली आहे. भरपूर फायदा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात आहात? मग 'ही' बातमी नक्कीच वाचा दरम्यान, 14 फेब्रुवारी 2005 मध्ये युट्यूबला अधिकृतरित्या लाँच करण्यात आलं. ऑनलाइन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेली ही वेबसाइट गुगलनंतरची सर्वाधिक वापरली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची वेबसाइट आहे. युट्यूबचे 2.5 बिलियनपेक्षा अधिक महिन्याचे युजर असून ते दरदिवशी 1 बिलियन तासांपेक्षा अधिक व्हिडिओ पाहत असल्याचा दावा वेबसाइटने केला.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Youtube, YouTube Channel

पुढील बातम्या