मुंबई, 9 ऑगस्ट : मोबाईल हे केवळ संपर्काचं साधन न राहता आता ते स्टेटस सिंबॉल बनलं आहे. अमूक एखाद्या ब्रँडचा मोबाईल तुमच्याकडे असेल तर तुम्ही उच्चभ्रू वर्गातील अशी गणनाही अनेकदा होताना पाहायला मिळते. असंख्य प्रकार आणि फीचरचे (Features) मोबाईल बाजारात उपलब्ध होत आहेत. दररोज यात बदल होत असल्याचं चित्र आहे. नुकतेच ‘नथिंग फोन वन’ (Nothing Phone 1) हा मोबाईल पारदर्शक (Transparent Smartphone) अशा नव्या डिझाइनमध्ये दाखवण्यात आला. या मोबाईलचं बॅक म्हणजेच रिअर पॅनल डिझाईन सर्वांत वेगळं व भुरळ घालणारं आहे. ट्विटर अकाउंटवर एका युजरकडून हा स्मार्टफोन दाखवण्यात आला. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
हा स्मार्टफोन भविष्यात येईल की नाही याबाबत आताच सांगता येत नाही. पण यात वापरण्यात आलेली पारदर्शकतेची संकल्पना भन्नाट अशी आहे.
पारदर्शक फोनचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याखाली युजर्सच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी आहे की नाही, ती पण पारदर्शक तर नाही ना? असा प्रश्न एका युजरने उपस्थित केला आहे. मोबाईलचं काय त्याचा वायरलेस चार्जरही पारदर्शक आहे. हा स्मार्टफोन पाहताच त्याचं वेगळेपण सिद्ध होतं. परंतु, आगामी काळात या पारदर्शक स्मार्टफोनची संकल्पना (Concept smartphone) खरी ठरू शकते. परंतु, अशा प्रकारचा फोन कधी लाँच होईल, याबद्दल आताच काही सांगता येत नाही. ट्विटरवर व्हिडिओत दाखवलेल्या पादर्शक फोनला अनेकजण खरं मानत आहेत. पण ती केवळ फोनची एक संकल्पना आहे.
Smartphone Tips मोबाईल पाण्यात पडल्यावर त्वरित करा ‘हे’ काम, नाहीतर...
A transparent smart phone design pic.twitter.com/9iXstC7jXN
— Vala Afshar (@ValaAfshar) August 5, 2022
अनेकदा टिकटॉक व्हिडिओतही दिसला फोन
पारदर्शक स्मार्टफोनचा हा व्हिडिओ वाला अफशर (Vala Afshar) या नावाच्या ट्विटर युजरने शेअर केला आहे. भविष्यातील पादर्शक फोनच्या डिझाईनची संकल्पना यात दिली गेली आहे. या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टिम एमआययूआय (MIUI) सारखी वाटत आहे. फोनप्रमाणे त्याचा चार्जरही वायरलेस असल्याचं दिसतं. अशा प्रकारचं फोनचं डिझाईन याआधी टिकटॉक व्हिडिओतही दाखवण्यात आलं आहे.
5G Network: नवीन फोन घ्यायची गरज नाही, तुमच्या 4G फोनमध्येही मिळू शकतं फास्ट इंटरनेट
पहिल्यांदा मोबाईल आला तेव्हा तो गरज म्हणून वापरला जात होता. परंतु नंतर मात्र त्यात असंख्य फीचर जोडले गेले. बाजारात स्पर्धा करणाऱ्या अनेक कंपन्याही दाखल झाल्या. आता तर बोलण्यासह मोबाईल हे फोटो, व्हिडिओ तयार करणं व युजरच्या प्रकृतीचे अपडेट ठेवण्यासाठीही वापरले जात आहेत. भविष्यात यात आणखी बरीच फीचर्स येतील. पारदर्शक फोनही त्यातीलच एक प्रकार असू शकतो, असं मानलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Smartphone, Tech news