'टीव्ही बघायची असेल तर KYC करा नाहीतर...', TRAIचा नवा नियम

'टीव्ही बघायची असेल तर KYC करा नाहीतर...', TRAIचा नवा नियम

ट्रायने टीव्हीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. आता डीटीएच, केबल नेटवर्कच्या सर्व ग्राहकांसाठी केवायसी बंधनकारक केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया(TRAI) ने या वर्षाच्या सुरुवातील टीव्हीच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. आता टीव्ही पाहणाऱ्यांसाठी नवा नियम लागू करण्यात आला आहे. ट्रायने डीटीएच सबस्क्रायबर्ससाठी केवायसी बंधनकारक केलं आहे. देशातील सर्व केबल ऑपरेटर्सना ट्रायने आदेश दिले आहेत की, सर्व सबस्क्रायबर्सना केवायसी करावं लागणार आहे. केवायसीची ही प्रक्रिया सोपी आहे.

ट्रायचा नवा नियम सध्याचे ग्राहक आणि नवीन डीटीएच सबस्क्रायबर्ससाठी लागू आहे. सध्याच्या ग्राहकांना केवायसी करण्यासाठी 2 वर्षांचा वेळ देण्यात आला आहे. तर नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना आधी केवायसी करावे लागले. त्यानंतर नवीन डीटीएच कनेक्शन सोबत मिळणाऱा सेट टॉप बॉक्स इन्स्टॉल केला जाईल. केवायसीसाठी ग्राहकांना आधारकार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, पासपोर्ट यासारख्या कागदपत्रांची झेरॉक्स द्यावी लागते.

DTH साठी KYC करण्यासाठी इंडस्ट्रीतील स्टेकहोल्डर्सची परवानगी मिळाल्यानंतर नवीन नियम लागू केला आहे. यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होत होती. नवीन कनेक्शन इन्स्टॉल करण्यापूर्वी केवायसी करावे लागेल. त्यानंतर नवीन सेट टॉप बॉक्स सुरू होईल. ज्या ठिकाणी सेट टॉप बॉक्स लावायचा आहे तिथलाच पत्ता कनेक्शनच्या अर्जावर असणे आवश्यक आहे.ग्राहकांची ओळख पडताळण्यासाठी केबल ऑपरेटरच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड पाठवण्यात येईल. त्यानंतर सेट टॉप बॉक्सच्या इन्स्टॉलेशनची प्रक्रिया सुरू होईल.

वाचा : तुमच्या चेहऱ्यात असतील 'या' गोष्टी तर मिळतील 92 लाख रुपये!

ज्या ग्राहकांकडे मोबाईल नाही त्यांना ओळखपत्र द्यावं लागेल. तसंच सध्याच्या ग्राहकांमध्ये ज्यांच्या डीटीएचला मोबाइल नंबर लिंक नाही त्यांनी 2 वर्षात ते करून घ्यावं लागेल. केबल ऑपरेटर्सना ग्राहकांच्या पडताळणीची कागदपत्रे गोळा कऱण्याची परवानगी आहे. पण ट्राय सेट टॉप बॉक्सच्या माध्यमातून ग्राहकांच्या ठिकाणाची माहिती गोळा करता येणार नाही.

वाचा : तुम्हाला कोण ट्रॅक करतंय? नव्या अपडेटमुळे मिळणार रिपोर्ट

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

Published by: Suraj Yadav
First published: October 26, 2019, 2:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading