News18 Lokmat

तुमच्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्समध्ये होणार 'हा' मोठा बदल

ग्राहकांची सुविधा लक्षात घेता सरकारही नवनवे प्रयोग करतेय. ज्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा होईल.

News18 Lokmat | Updated On: May 13, 2019 07:26 PM IST

तुमच्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्समध्ये होणार 'हा' मोठा बदल

मुंबई, 13 मे : डीटीएच सर्विसनंतर टीव्हीच्या प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळे बदल दिसायला लागलेत. ग्राहकांची सुविधा लक्षात घेता सरकारही नवनवे प्रयोग करतेय. ज्यामुळे ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा होईल. टीव्ही पाहण्यासाठी तुम्हाला वेगळा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्विस प्रोव्हाइडरसोबत पूर्ण सेट टाॅप बाॅक्स बदलावा लागतो. त्यावरच सध्या TRAI विचार करतंय.

Redmi Note 6 Pro वर इथे मिळतेय मोठी ऑफर, कशी मिळवायची सूट?

टीव्ही प्लॅनच्या पोर्टेबिलिटीत होतील हे बदल

ट्राय हा प्रयत्न करतंय की नव्या नियमांबरोबर टीव्ही सेट टाॅप बाॅक्सलाही मोबाइलसारखं सिम कार्ड असेल. दर वेळी डीटीएच कंपनीचा वेगळा सेट टाॅप बाॅक्स असतो. तो बदलण्याचा खर्च करावा लागतो. अनेकदा तो खर्च जास्त असतो.

TRAI याच नियमात बदल करू पाहतंय. ही सिम कार्डाची पद्धत कधी सुरू होईल, हे अजून नक्की ठरलं नाहीय. पण या वर्षाच्या शेवटपर्यंत हा बदल होईल, अशी आशा आहे.

Loading...

9व्या दिवशी शेअर बाजार घसरण होऊन बंद, गुंतवणूकदारांचे बुडाले 8.56 लाख कोटी रुपये

याआधी DTH कंपन्यांना  TRAIनं दिला इशारा

TRAIनं DTH कंपन्यांना इशारा दिलाय. त्यांनी सांगितलंय की तुम्ही नियमांचं उल्लंघन केलंत तर त्याचे परिणाम भोगावे लागतील.

World Cup : आयपीएल गाजवणारा 'हा' गोलंदाज वाढवणार भारतीय संघाची डोकेदुखी

ट्रायनं सांगितलंय, ग्राहकांचं हित नेहमीच महत्त्वाचं आहे. TRAI चे अध्यक्ष आर.एस.शर्मा म्हणाले, ' ग्राहकांची आवड महत्त्वाची. शिवाय त्यांना तोटा होता कामा नये. जे कंपनींच्या नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांना परिणामांना तोंड द्यावं लागेल.VIDEO : मोदी हे रडार शोधणारे शास्त्रज्ञ, राज ठाकरेंचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 13, 2019 07:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...