तुमचा मोबाइल नंबर 11 अंकी होणार, TRAI ने सांगितलं कारण

तुमचा मोबाइल नंबर 11 अंकी होणार, TRAI ने सांगितलं कारण

सध्या देशात 10 अंकी मोबाइल नंबर आहेत. ट्रायने आता 11 अंकी मोबाइल क्रमांकाबद्दल लोकांकडून सुचना मागवल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने देशातील सध्याचे 10 अंकी मोबाइल नंबर 11 अंकात करण्यासाठी लोकांकडून सुचना मागवल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळं हा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रायने याबद्दल एक पत्रही दिले आहे. मोबाइल आणि लँडलाइनसाठी एकीकृत अंक योजना सुरू करण्यात येणार आहे.

ट्रायने पत्रात म्हटलं आहे की, जर भारतात 2050 पर्यंत वायरलेस फोनची क्षमती 200 टक्क्यांनी वाढली तर देशातील अॅक्टीव्ह मोबाइलची संख्या 3.28 अब्ज इतकी होईल. सध्या देशात 1.2 अब्ज फोन कनेक्शन आहेत.

2050 पर्यंत देशात मोबाइल फोनसाठी 4.68 अब्ज मोबाईल नंबरची गरज पडेल. सरकारने याआधीच मशिन्समधील परस्पर इंटरने कनेक्शन/ इंटरनेट ऑफ द थिंग्ससाठी 13 अंकी नंबर सुरू केले आहेत.

सध्या 9,8 आणि 7 ने सुरू होणाऱ्या 10 डिजिटच्या मोबाइलचे 2.1 बिलियन कनेक्शन देता येतील. त्यामुळे आगामी काळात 11 अंकी नंबरची गरज पडेल.

भारतात याआधी पहिल्यांदा 1993 आणि 2003 मध्ये नंबरिंग प्लॅनची समीक्षा झाली होती. 2003 च्या प्लॅननुसार 750 मिलियन फोन कनेक्शन वाढली होती. यामध्ये 450 मिलियन सेल्युलर आणि 300 मिलियन बेसिक आणि लँडलाइन फोन होते. मोबाइल फोनच्या अंकांनाच नाही तर फिक्स लाइन नंबरलासुद्धा 10 डिजिट नंबरिंग मध्ये अपडेट केलं जाईल अशी चर्चा आहे.

VIDEO : निवडणुकीच्या तारखातील 'त्या' 2 दिवसावर भुजबळांनी व्यक्त केला संशय, म्हणाले...

Published by: Suraj Yadav
First published: September 21, 2019, 4:55 PM IST
Tags: TRAI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading