मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

वाहतुकीचे नियम मोडल्यावर फक्त दंड नाही तर लायसनही जप्त होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे का?

वाहतुकीचे नियम मोडल्यावर फक्त दंड नाही तर लायसनही जप्त होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे का?

नव्या मोटार व्हेइकल अॅक्टला लागू केल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडू शकतं. नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. नव्या कायद्यानुसार पोलिस याची अंमलबजावणी करत आहेत. नियम मोडणाऱ्यांकडून मोठी पावती फाडली जात आहे.

नव्या मोटार व्हेइकल अॅक्टला लागू केल्यानंतर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणं महागात पडू शकतं. नव्या अॅक्टनुसार वाहुतकीचे नियम मोडल्यास दंड म्हणून मोठी रक्कम भरावी लागते. नव्या कायद्यानुसार पोलिस याची अंमलबजावणी करत आहेत. नियम मोडणाऱ्यांकडून मोठी पावती फाडली जात आहे.

नव्या वाहतूक कायद्यानुसार नियम मोडल्यानंतर वाहनधारकांना मोठ्या रकमेचे दंड केले जात आहेत. पण काही नियम असे आहेत जे मोडल्यास तुमचं लायसनही जप्त होऊ शकतं.

  • Published by:  Suraj Yadav

मुंबई, 28 फेब्रुवारी : वाहतुकीचे नियम सर्व वाहनधारकांना माहिती असतीलच असं नाही. अनेकदा आपण सर्रास नियम मोडतोय याची जाणीवही वाहन चालवणाऱ्यांना नसते. याबाबत वाहतूक नियंत्रकांकडून वारंवार सूचना आणि माहिती दिली जाते. तरीही नियम मोडले जातात आणि मग दंडात्मक कारवाई होते.

काही वेळा दंड म्हणून रक्कम भरावी लागते पण काही नियम असे आहेत जे मोडल्यास तुमचं लायसन जप्त केलं जाऊ शकतं. आपल्याला याची माहिती नसते आणि जेव्हा कारवाई होते तेव्हा पश्चाताप करत बसावा लागतो.

कोणत्याही रस्त्यावर ठिकठिकाणी वेगाची मर्यादा दर्शवणारे बोर्ड दिसतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुम्ही मर्यादेपेक्षा जास्त वेगानं गाडी चालवलीत तर तुम्हाला टोलनाक्यावर अडवलं जातं. त्याठिकाणी दंड तर होतोच पण लायसनसुद्धा जप्त केलं जातं.

रस्त्यावर गर्दी असेल किंवा सिग्नल पडला असेल तर लोकांना बाजूने , फुटपाथवरून गाडी चालवण्याची सवय आहे. इतकंच काय तर लहान उंचीच्या डिव्हायडरवरून गाडी दुसऱ्या बाजुला नेतात. अशी चूक करणंही तुम्हाला महागात पडू शकतं.

वाचा : WhatsApp मुळे जास्त इंटरनेट डेटा जातोय? वापरा या टिप्स

ओव्हरटेक करण्यासाठी अनेकदा वेगानं गाडी चालवली जाते. अशावेळी तुम्ही 40 किमी वेग मर्यादा असलेल्या रस्त्यावरून जात असाल तर अडचण नाही. पण हायस्पीडच्या रोडवरून जाताना ओव्हरटेक करणं अडचणीत आणणारं ठरू शकतं. ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने गेल्यास लायसन जप्त केलं जाईल.

रस्त्याने गाडी चालवताना पाठिमागून अँब्युलन्स येत असेल तर तिला वाट दिली जाते. मात्र तुमच्याकडून गाडीला पुढे जाण्यात अडथळा निर्माण झाला कीवा वाट अडवलीत तर तुमचं लायसन जप्त होऊ शकते. तसेच 5 ते 10 हजार रुपयांचा दंडही होऊ शकतो.

रहदारीच्या रस्त्यावर रेसिंग करणं किंवा स्टंटबाजी करणं नियमात बसत नाही. यामुळेसुद्धा तुमच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. रेसिंगसाठी रेसिंग ट्रॅकवर जाणं योग्य ठरेल. जर हा नियम तोडलात तरीही लायसन तीन महिने पोलिसांच्या ताब्यात गेलंच म्हणून समजा.

हॉर्न वाजवू नयेत म्हणून सध्या पोलिसांनी जनजागृती सुरु केली आहे. त्यातही अनेकदा गाड्यांचे नेहमीचे हॉर्न काढून वेगवेगळ्या आवाजातले हॉर्न बसवले जातात. त्यामुळे हॉर्नच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळं ट्राफिक पोलिस तुमचं लायसन जप्त करू शकतात.

वाचा : Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर

First published:

Tags: Motor vehical act