Home /News /technology /

Jioमध्ये TPGची नवी गुंतवणूक, 7 आठवड्यांमध्ये 1 लाख कोटींचा विक्रमी टप्पा ओलांडला

Jioमध्ये TPGची नवी गुंतवणूक, 7 आठवड्यांमध्ये 1 लाख कोटींचा विक्रमी टप्पा ओलांडला

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनीही TPG ने गुंतवणूक केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

    मुंबई 13 जून:  प्रसिद्ध TPG या  कंपनीने Jio Platforms मध्ये 4,546.80 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्या मोबदल्यात कंपनीला Jioमध्ये 0.93 टक्के stake मिळणार आहेत. Jioमध्ये गुंतवणूक करणारी TPG ही नववी कंपनी आहे. तर गेल्या सात आठवड्यांमध्ये जीओत तब्बल 1 लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक आली असून हा एक विक्रम मानला जात आहे. या 9 दिग्गज कंपन्यांना Jio 21.99 टक्के stakes देणार आहे. तर या कंपन्यांनी एकूण 102,432.15 लाख कोटींची गुंतवणूक केल्याने Jioची ताकद आणि विस्तार आणखी झपाट्याने होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनीही TPG ने गुंतवणूक केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. TPGसारखी दिग्गज कंपनीने गुंतवणूक केल्याने Jio आणखी वेगाने पुढे जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. या आधी Silver Lak आणि त्यांच्या इतर गुंतवणूकदारांनी Jioमध्ये आणखी 4,546 कोटींची गुंतवणूक केली आहे. या आधीही Silver Lak कंपनीने Jioमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. 4 जूनलाच अबुधाबीच्या Mubadala Investment Companyने Jioमध्ये 9,093 कोटींची गुंतवणूक केली होती. त्याच बरोबर जगभरातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुक कंपनीने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओमध्ये 9.99 टक्के भागीदारी घेत 43,574 कोटी रुपये गुंतवणूक केल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. फेसबुकनं व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर सर्वात मोठी नेटवर्क म्हणून ओळखलं जात आहे. फेसबुक आणि जिओमध्ये झालेल्या या करारामुळे भारतात टेलिकॉम आणि डिजिटल मीडियासाठी तरुणांना नव्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास मार्क झुकनबर्ग यांनी व्यक्त केला होता. रिलायन्सच्या डिजिटल व्यवसायातील मोठा प्लॅटफॉर्म हा जिओचा आहे. रिलायंस जियो इन्फोकॉम लिमिटेड ही जिओ प्लॅफॉर्ममधील कंपनी आहे. याशिवाय माय जियो, जिओ टीव्ही, जियो सिनेमा, जिओ न्यूज आणि जिओ सावन. एवढेच नव्हे तर रिलायन्स या कंपनी अंतर्गत आपले शिक्षण, आरोग्य सेवा आणि कृषी डिजिटल सेवा देखील देते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या