मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सौरऊर्जेवरच होणार चार्ज; Toyota ची पहिलीच Electric SUV

सौरऊर्जेवरच होणार चार्ज; Toyota ची पहिलीच Electric SUV

इलेक्ट्रिक कार्सच्या (Electric Cars) बाजारपेठेत जपानच्या (Japan) टोयोटानं (Toyota) धमाकेदार प्रवेश केला आहे.

इलेक्ट्रिक कार्सच्या (Electric Cars) बाजारपेठेत जपानच्या (Japan) टोयोटानं (Toyota) धमाकेदार प्रवेश केला आहे.

इलेक्ट्रिक कार्सच्या (Electric Cars) बाजारपेठेत जपानच्या (Japan) टोयोटानं (Toyota) धमाकेदार प्रवेश केला आहे.

नवी दिल्ली, 22 एप्रिल : हवामान बदल आणि त्याचे दूरगामी दुष्परिणाम लक्षात घेऊन जगभरात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याकरता डिझेल, पेट्रोलऐवजी सीएनजी, इलेक्ट्रिक तसंच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. इलेक्ट्रिक कार्सचा (Electric Cars) वापर हळूहळू वाढत आहे. अमेरिकेत (USA) आलेल्या टेस्ला (Tesla) या इलेक्ट्रिक कारमुळे या बाजारपेठेला चालना मिळाली असून भारतातील (India) ग्राहक वर्गातही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या इलेक्ट्रिक कार्सच्या बाजारपेठेत जपानची (Japan) आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टोयोटानं (Toyota) धमाकेदार प्रवेश केला आहे. टेस्लाच्या कार्सना टक्कर देण्यासाठी ‘बीझेड 4 एक्स’ (BZ4X) ही आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही (Electric SUV) सादर केली आहे. शांघाय ऑटो शोमध्ये (Shanghai Auto Show) सोमवारी कंपनीनं ही एसयूव्ही सादर केली. येत्या 5 वर्षात नवीन 15 इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. हे वाचा - मोठ्या कुटुंबासाठी बेस्ट आहे ही MPV, सिंगल चार्जवर धावणार 522 KM ई-टीएनजीए (e-TNGA ) प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात आली असून केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी हा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आला आहे. हा प्लॅटफॉर्म वापरून कंपनी वेगवेगळ्या आकाराच्या आणि किंमतीच्या कार तयार करू शकणार असून, त्याद्वारे प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. या कारची ही आहेत खास वैशिष्ट्ये शांघाय ऑटो शोमध्ये सादर करण्यात आलेल्या या एसयूव्हीमध्ये काही खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये साधारण स्टीअरिंग व्हीलऐवजी विशिष्ट आकारातील योक आहे. या कारची बॅटरी सौर ऊर्जेवर (Solar Power) चार्ज (Charge) केली जाऊ शकते. ही या कारची खासियत आहे. यामुळे ही कार इतर कार्सपेक्षा वेगळी ठरते. 2022 च्या मध्यापर्यंत ही कार विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकते. 2025 पर्यंत 15 इलेक्ट्रिक कार्स दाखल होणार 2025 पर्यंत 15 इलेक्ट्रिक कार दाखल करण्याची कंपनीची योजना असल्याचं टोयोटाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी मासाहिको माएदा यांनी सोमवारी या कारच्या अनावरणप्रसंगी सांगितलं. या योजनेंतर्गत कंपनी ‘बीझेड’ मालिकेच्या अशा 7 कार्सची मॉडेल्स बाजारात आणणार असून, ‘बीझेड 4एक्स’ इलेक्ट्रिक एसयूव्ही ही ‘बीझेड’ मालिकेत दाखल होणारी पहिली कार असेल. ‘बीझेड’चा अर्थ ‘बियॉंड झिरो’ (Beyond Zero) असा असून शून्याच्या पलिकडे म्हणजेच शून्य कार्बन उत्सर्जन (Zero Carbon Emmission) करणाऱ्या कार्स असा संदर्भ या कार्सना आहे. हे वाचा - 10 हजार रुपयांनी स्वस्त झाला ‘हा’ गेमिंग स्मार्टफोन टेस्लानं इलेक्ट्रिक कार्स दाखल केल्यापासून भारतातही इलेक्ट्रिक कार्सबाबतच्या चर्चेला गती मिळाली आहे. एक मोठा ग्राहक वर्ग टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची आतुरतेने वाट पाहत आहे. त्यामुळं टोयोटाच्या या इलेक्ट्रिक कारला टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारची मोठी स्पर्धा असणार आहे.
First published:

Tags: Car, Electric vehicles

पुढील बातम्या