सायकल (cycle) चालवणं शरीरासाठी खूप चांगलं आहे. सायकलिंगमुळे मानसिक (Mental Health), शारीरिक आरोग्य (Physical Health) सुधारते. त्यामुळे आजार दूर राहतात. नियमित सायकल चालवणं हा 'एरोबिक' प्रकार असून, त्यामुळे शरीरावर जास्त ताण पडत नाही. आठवड्यातून तीन दिवस सायकल चालवली, तरी वजन कमी (helps to loose weight) करण्यास मदत होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सायकलमुळे प्रदूषण (pollution) होत नाही. बाजारात साध्या सायकल्स, गिअरच्या सायकल्स आणि इलेक्ट्रिक सायकल्सही (electric cycle) उपलब्ध आहेत. ‘टूशे’ या इलेक्ट्रिक मोबिलिटी स्टार्टअप कंपनीने (Electric Mobility Startup Toutche) भारतात नुकतीच एक नवीन इलेक्ट्रिक सायकल सादर केली आहे. ही सायकल दिसायला साध्या सायकलीसारखीच (normal cycle) दिसते; मात्र तिची अनेक वैशिष्ट्यx आहेत. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे सायकलची बॅटरी (battery) संपल्यानंतर पॅडल मारूनही सायकल चालवता येते. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
टूशेने भारतात सादर केलेल्या इलेक्ट्रिक सायकल मॉडेलचं नाव हीलियो H100 असं आहे. या सायकलची किंमत 48,900 रुपयांपासून सुरू होते. एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर ही सायकल 60 ते 80 किलोमीटरपर्यंतचं अंतर पार करू शकते. या सायकलमध्ये ली-आयन बॅटरी आणि 250 वॉल्टची रिअर हब मोटार आहे. ही सायकल इलेक्ट्रिक मोडशिवाय साध्या सायकलीप्रमाणे पॅडल मारून, तसंच पॅडल असिस्ट मोडवरदेखील चालवता येते.
ही सायकल स्प्रिंग ग्रीन आणि व्हाइट या दोन रंगांत बाजारात उपलब्ध आहे. सायकलची फ्रेम साइज 19 इंच आहे. ही सायकल 2334 रुपयांच्या ईएमआयवरदेखील खरेदी करणं शक्य आहे. ही सायकल (cycle speed) 25 किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकते, अशी माहिती टूशे कंपनीकडून देण्यात आली आहे.
हे वाचा - वारंवार कॉल्स,SMS करुन त्रास देणाऱ्यांना लागणार चाप;भरावा लागेल 10000 पर्यंत दंड
टूशे इलेक्ट्रिक या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक रघू केराकट्टी यांनी या सायकलबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'गेल्या काही महिन्यांमध्ये ई-बाइकची मागणी (E-bikes demand) वाढली आहे. ही मागणी लक्षात घेऊन कंपनी इलेक्ट्रिक वाहनं (electric vehicles) बाजारात आणण्यावर भर देत आहे.'
हीलियो एम100, एम200 आणि एच200 या नवीन सायकल मॉडेल्ससह (new models of cycle) नव्या ई-बाइकसाठीही कंपनीने बुकिंग सुरू केलं आहे. लोक कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन इलेक्ट्रिक सायकल आणि ई-बाइक बुक करू शकतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Electric vehicles, India