मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Twitterला टक्कर देण्यासाठी आलं स्वदेशी Tooter; राहुल गांधी, PM मोदी तसंच विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी बनवल अकाउंट

Twitterला टक्कर देण्यासाठी आलं स्वदेशी Tooter; राहुल गांधी, PM मोदी तसंच विराट कोहलीसारख्या दिग्गजांनी बनवल अकाउंट

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील Tooter वर त्यांचे अकाउंट बनवले आहे.

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील Tooter वर त्यांचे अकाउंट बनवले आहे.

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील Tooter वर त्यांचे अकाउंट बनवले आहे.

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर: कोरोना काळात (Coronavirus) सरकारने आत्मनिर्भर भारतचा नारा दिल्यानंतर अनेकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने काही विदेशी Apps वर देखील बंदी आणली आहे. दरम्यान काही विदेशी साइट्स किंवा apps असे आहेत की ज्यांची जागा दुसरं कुणीही घेणं अशक्य वाटते. मात्र लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर (Twitter) वर सध्या टूटर (Tooter) ची चर्चा सुरू आहे.

तुम्ही जर Tooter चं नाव पहिल्यांदा ऐकत असाल तर, या साइटला ट्विटरचं स्वदेशी व्हर्जन म्हटलं जात आहे अर्थात ट्विटरचे भारतीय मॉडेल (Desi Rival of Twitter). सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की. ट्विटरला टक्कर देण्यासाठी भारतीय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म Tooter सुरू करण्यात आले आहे. मेड इन इंडिया (Made in India) अंतर्गत हे स्वदेशी नेटवर्क तयार करण्यात आल्याने सोशल मीडियावर याची बरीच चर्चा सुरू आहे.

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील Tooter वर त्यांचे अकाउंट बनवले आहे, जे की व्हेरिफाइड अकाउंट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेते राहुल गांधी, अभिनेता अभिषेक बच्चन, टीम इंडियाचे कर्णधार विराट कोहली आणि महेंद्र सिंह धोनी या दिग्गजांचे देखील यावर ऑफिशिअर अकाउंट आहे. भारतीय जनता पार्टीचे देखील अधिकृत अकाउंट या प्लॅटफॉर्मवर आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.

(हे वाचा-कोरोना लसीकरणाचा सर्व खर्च उचलणार मोदी सरकार, अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा)

अहवालाच्या ममते Tooter यावर्षी जून-जुलैच्या दरम्यान लाँच करण्यात आले होते, मात्र सध्या हा प्लॅटफॉर्म चर्चेचा विषय बनला आहे. Tooter ने त्यांच्या साइटवर About US सेक्शनमध्ये असं म्हटलं आहे की, आमचं असं मत आहे की भारतात एक स्वदेशी सोशल नेटवर्किंग नेटवर्क असायला हवं. Tooter स्वदेशी आंदोलन 2.0 (Swadeshi Andolan 2.0) आहे. Tooter ने मेड इन इंडिया या टॅगवर भर दिला आहे. सोशल मीडियावर असा दावा करण्यात येतो आहे की, Tooter  हा प्लॅटफॉर्म Twitter ला टक्कर देण्यासाठी बनवण्यात आला आहे.

(हे वाचा-31 डिसेंबरपर्यंत उड्डाण घेणार नाहीत आंतरराष्ट्रीय विमानं, DGCAचे आदेश)

भारतामध्ये अधिकाधिक जणांनी स्वदेशी अॅप्सचा वापर करावा हे यामागचे ध्येय आहे.  Tooter वर अकाउंट काढल्यानंतर तुम्ही अन्य लोकांशी जोडले जाल. गुगल प्लेस्टोअरवर देखील हे अॅप उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे tooter.in वर जाऊन देखील याचा वापर करता येईल.

First published:

Tags: Twitter