• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Airtel चा हा रिचार्ज करा अन् मिळवा IPL फ्रीमध्ये पाहण्याची संधी, पाहा डिटेल्स

Airtel चा हा रिचार्ज करा अन् मिळवा IPL फ्रीमध्ये पाहण्याची संधी, पाहा डिटेल्स

Airtel च्या अनेक प्रीपेड रिचार्जसह IPL फ्रीमध्ये पाहता येऊ शकतं. Airtel च्या प्रीपेड रिचार्जसह Disney+ Hotstar Mobile चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन फ्री दिलं जातं.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : IPL सीजन सुरू झाला आहे. Airtel च्या अनेक प्रीपेड रिचार्जसह IPL फ्रीमध्ये पाहता येऊ शकतं. Airtel च्या अनेक प्रीपेड रिचार्जसह Disney+ Hotstar Mobile चं एक वर्षाचं सब्सक्रिप्शन फ्री दिलं जातं. हा प्लॅन 499 रुपयांपासून सुरू होतो आणि 2798 रुपयांपर्यंत जातो. Airtel च्या 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन एका वर्षाच्या Disney+ Hotstar Mobile सह येतो. यात 3GB डेली डेटा मिळतो. त्याशिवाय अनलिमिटेड कॉलही मिळतात. या प्लॅनमध्ये दररोज 100 SMS दिले जातात. या प्लॅनची वॅलिडिटी 28 दिवसांची आहे. यापूर्वी या प्लॅनच्या आधी 448 रुपयांचा प्लॅन होता. परंतु कंपनीने तो प्लॅन बंद करुन काही दिवसांपूर्वी 499 रुपयांचा प्लॅन लाँच केला. Airtel च्या 499 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनशिवाय 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह Disney+ Hotstar Mobile प्लॅन फ्री मिळतो. या प्लॅनसह युजरला दररोज 2GB डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS दिले जातात.

  आता UPI पेमेंट करणं अधिक सोपं होणार, Airtel कडून Pay to Contacts सर्विस लाँच; असा होणार फायदा

  त्याशिवाय Airtel च्या आणखी एका प्लॅनमध्ये Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन फ्री मिळतं. हा प्लॅन 2798 रुपयांचा आहे. यात दररोज 2GB डेटा दिला जातो. त्याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि दररोज 100 SMS दिले जातात. या प्लॅनची वॅलिडिटी 365 दिवस अर्थात वर्षभरासाठी आहे.

  केवळ 1 रुपया अधिक देऊन मिळवा 28 दिवसांची एक्स्ट्रा वॅलिडिटी; Airtel चा हा प्लॅन एकदा पाहाच

  Disney+ Hotstar Mobile च्या सब्सक्रिप्शनशिवाय Airtel Amazon Prime Video Mobile Edition फ्री ट्रायलही 30 दिवसांसाठी देतं. त्याशिवाय Wynk Music, हॅलो ट्यूनचा अॅक्सेसही ग्राहकांना दिला जातो.
  Published by:Karishma
  First published: