मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /आता तुमच्या स्मार्टफोननेच मच्छर होणार OUT! बसल्या बसल्याच होणार डासांचा खात्मा

आता तुमच्या स्मार्टफोननेच मच्छर होणार OUT! बसल्या बसल्याच होणार डासांचा खात्मा

Mijia Smart Mosquito Repellant 2 या मच्छर पळवणाऱ्या मशीनचं नव वर्जन ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि XiaoAI वॉईस कंट्रोलसह येतं.

Mijia Smart Mosquito Repellant 2 या मच्छर पळवणाऱ्या मशीनचं नव वर्जन ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि XiaoAI वॉईस कंट्रोलसह येतं.

Mijia Smart Mosquito Repellant 2 या मच्छर पळवणाऱ्या मशीनचं नव वर्जन ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि XiaoAI वॉईस कंट्रोलसह येतं.

नवी दिल्ली, 12 मे : स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने (Xiaomi) एक खास मशीन लाँच केलं आहे. हे मशीन मच्छर पळवण्याचं काम करतं. शाओमीने हे मशीन गेल्या वर्षी लाँच केलं होतं, ज्याचं नवं वर्जन आता ‘मिजिया स्मार्ट मस्कीटो रिपेलेन्ट 2’ (Mijia Smart Mosquito Repellant 2) लाँच केलं आहे. गिज्मोचायनाच्या रिपोर्टनुसार, या मच्छर पळवणाऱ्या मशीनचं नव वर्जन ब्लूटूथ कनेक्टिविटी आणि XiaoAI वॉईस कंट्रोलसह येतं. शाओमीने हे मशीन आता क्राउडफंडिंगद्वारे चीनमध्ये लाँच केलं आहे.

क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे मिजिया स्मार्ट मस्कीटो रिपेलेन्ट 2 मशीन 12 मेपासून खरेदी करता येऊ शकतं. या मशीनमध्ये ट्रायफ्लूथरिनचा वापर केला जातो, जो अँटी-मस्कीटो एजेंट रुपात काम करतं.

या मशीनच्या सिंगल रिपेलेन्टचा वापर 1080 तासांपर्यंत केला जातो. जर हे मशीन दररोज 8 तास वापरलं, तर 4.5 महिने चालू शकतं. शाओमीच्या या प्रोडक्टची किंमत 69 युआन म्हणजेच जवळपास 790 रुपये इतकी आहे. याची क्राउडफंडिंग किंमत 59 युआन, जवळपास 670 रुपये आहे.

(वाचा - Oxygen Level तपासण्यासाठी स्मार्टफोनमध्ये Oximeter App चा वापर धोकादायक)

पॉवर मोड्स -

शाओमीचं हे प्रोडक्ट 28 चौरस मीटर जागा कव्हर करण्यास सक्षम आहे. शाओमीने या मशीनमध्ये दोन पॉवर मोड्स दिले आहेत. या मशिनला AA बॅटरी आणि USB-C केबलद्वारे कनेक्ट करुन वापरता येऊ शकतं. यात इन-बिल्ट फॅन देण्यात आला आहे, जो ट्रायफ्लूथरिनला सर्व ठिकाणी पसरवण्याचं काम करतो.

(वाचा - Gmail किती वेबसाईटवर लिंक आहे, असं तपासा; Delink करण्यासाठी पाहा सोपी प्रोसेस)

ब्लूटूथद्वारे या मशीनला फोनशी कनेक्ट करता येतं. या मशीनमध्ये टायमरही सेट करता येतो. USB-C पॉवर सप्लाय मोडमध्ये मशीन ऑन असल्यास, XiaoAI द्वारे आवाजानेही कंट्रोल केलं जाऊ शकतं.

First published:

Tags: Tech news, Xiaomi, Xiaomi redmi