• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • कोरोना संकटात Google, Microsoft नंतर आता Apple ही करणार भारताला आर्थिक मदत

कोरोना संकटात Google, Microsoft नंतर आता Apple ही करणार भारताला आर्थिक मदत

ॲपल या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांनीही भारतातील कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत करण्याचा कंपनी विचार करत आहे असं सांगितलं आहे. पण कूक यांनी कंपनी किती रक्कम देणार आहे हे मात्र जाहीर केलेलं नाही.

  • Share this:
नवी दिल्ली, 27 एप्रिल : भारतात कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस भारतातील रुग्णांची आणि मृत्युंची संख्या वाढतच चालली आहे. त्याचवेळी ऑक्सिजन, रेमिडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांचाही प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. अशावेळी अमेरिकेसह इतर देश भारताला ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा माल (Raw Material) आणि इतर वैद्यकीय सामग्री पुरवत आहेत. दुसरीकडे आर्थिक मदतीचा ओघही सुरू झाला आहे. भारतातील कॉर्पोरेट्सपैकी टाटा (TATA), महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra),रिलायन्स (Reliance) यांसारख्या कंपन्यांनीही सरकारला आणि प्रत्यक्ष जनतेला वेगवेगळ्या रूपांत मदत सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी गुगल (Google) आयटी कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी कोविड-19 कार्यासाठी मदत निधी म्हणून 135 कोटी रुपये मदत भारताला देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नडेला (Satya Nadella) यांनीही मायक्रोसॉफ्ट कंपनी (Microsoft) आपले स्रोत भारतातील वैद्यकीय मदत कार्यासाठी उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर केलं. आज ॲपल या अमेरिकी स्मार्टफोन उत्पादक कंपनीचे सीईओ टीम कूक (Tim Cook) यांनीही भारतातील कोविड-19 विरुद्धच्या लढ्यातील कोरोना योद्ध्यांसाठी आर्थिक मदत करण्याचा कंपनी विचार करत आहे असं सांगितलं आहे. पण कूक यांनी कंपनी किती रक्कम देणार आहे हे मात्र जाहीर केलेलं नाही.

(वाचा - Alert! शरीरातील Oxygen लेवल तपासण्यासाठी अ‍ॅप वापरताय, तर आधी हे वाचा)

ॲपलचे सीईओ टीम कूक यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, ‘कोविड-19 महामारीमुळे भारतात उद्भवलेल्या भयावह परिस्थितीत जे कोरोना महामारीविरुद्ध लढत आहेत ते कोरोना योद्धे, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वजण आणि आमच्या कंपनीतील भारतीय कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही वैचारिकदृष्ट्या ठामपणे उभे आहोत. भारतातील मदत कार्यासाठी ॲपल लवकरच आर्थिक मदत देईल.’ भारतातील हेल्थकेअर वर्कर्स, डॉक्टर हे प्राणाची बाजी लावून कोरोनाविरुद्ध लढत असून त्यांना साधनं कमी पडत आहेत. ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinder), मेडिकल इक्विपमेंट्स यांची टंचाई जाणवत आहे. ही परिस्थिती पाहून इतर अमेरिकी कंपन्यांनी मदत जाहीर केल्यावर ॲपलनेही मदत जाहीर केली.

(वाचा - भारताला Google कडून मोठी मदत;सुंदर पिचाईंनी केली 135 कोटींच्या रिलीफ फंडची घोषणा)

सुंदर पिचाई आणि सत्या नडेला हे दोघेही मूळचे भारतीय आहेत. आज मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले,‘कोविड मदत कार्यासाठी आमचा अधिकार, स्रोत आणि तंत्रज्ञान या सगळ्याचा आमची कंपनी वापर करेल त्याचबरोबर ऑक्सिजन कॉन्सनट्रेशन डिव्हायसेस खरेदीलाही मदत करेल.’त्याचवेळी गुगलचे सीईओ पिचाई म्हणाले होते, की गुगल युनिसेफ (UNICEF) आणि गिव्ह इंडिया (Give India) या संस्थांना 135 कोटी रुपये देईल आणि त्यांच्यामार्फत वैद्यकीय साधनं उपलब्ध करून देणं, जास्त प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी काम करणं आणि जनजागृती करण्याचा प्रयत्न करेल. ॲपलनेही मदत जाहीर केल्यामुळे नक्कीच परिस्थिती सुधारायला फायदा होईल.
First published: