मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फक्त एक चूक दाखवा आणि 7 कोटी मिळवा! Google देतंय करोडपती होण्याची संधी

फक्त एक चूक दाखवा आणि 7 कोटी मिळवा! Google देतंय करोडपती होण्याची संधी

आता गुगल अँड्रॉईड (Android) सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत मोठी रक्कम जिंकण्याची संधी देत आहे. तंत्रज्ञांनी या ओएसमध्ये गंभीर त्रुटी शोधल्यास, जवळपास 7 कोटीहून अधिक रक्कम दिली जाण्याची घोषणा गुगलकडून करण्यात आली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 27 मे : गुगलने (Google) नुकतंच अँड्रॉईड 12 बीटा (Android 12 Beta) मोडमध्ये लाँच केलं होतं. म्हणजेच काही निवडक स्मार्टफोनमध्येच गुगल अँड्रॉईड 12 ऑपरेट होईल. बीटा मोडमध्ये बग्स (Bugs) आणि Error येण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन वापरण्याचा अनुभव चांगला ठरू शकत नाही किंवा हे बग्स, एरर तुमच्या स्मार्टफोनसाठी धोकादायकही ठरू शकतात. त्यामुळे फोन रिस्पॉन्स देणं बंद करतो. आता गुगलने यावरच मार्ग काढण्यासाठी एक रिवॉर्ड प्रोग्राम जारी केला आहे. या प्रोग्रामध्ये तंत्रज्ञांना केवळ एक चूक काढून दाखवायची आहे.

गुगल अँड्रॉईड (Android) सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत मोठी रक्कम जिंकण्याची संधी देत आहे. कोणत्याही जाणकार, तंत्रज्ञांनी या ओएसमध्ये गंभीर त्रुटी शोधल्यास, जवळपास 7 कोटीहून अधिक रक्कम दिली जाण्याची घोषणा गुगलकडून करण्यात आली आहे.

जो कोणी तंत्रज्ञ सिक्योरिटी रिसर्चर गुगलच्या बग बाउंटीसाठी (Security Bugs in Android 12) इच्छुक आहे, त्याने अँड्रॉईड 12 चे दोन बीटा वर्जन - अँड्रॉईड 12 बीटा वर्जन 1 आणि अँड्रॉईड 12 बीटा वर्जन 1.1 ला पिक्सेल (Google Pixel) डिव्हाईससाठी बनलेल्या, ओएस बिल्टला अ‍ॅनालाईज (Analyze) करावं लागेल.

कंपनीचा अँड्रॉईड सिक्योरिटी रिवॉर्ड प्रोग्राम अँड्रॉईड 12 कोडला कव्हर करेल, ज्यामुळे हा बिल्ट पिक्सेल डिव्हाईस रन करेल.

(वाचा - कोरोना लशीसाठी तुम्ही ज्या Cowinवर नोंदणी करताय ते फेक नाही ना? अशी ओळखा Website)

गुगलने अँड्रॉईड रिवॉर्ड ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जो जाणकार, तंत्रज्ञ अँड्रॉईड 12 च्या दोन्ही बिल्टमध्ये सिक्योरिटी फॉल्ट 18 मे ते 18 जूनपर्यंत शोधून काढेल, त्याला 50 टक्क्यांचा बोनस रिवॉर्ड अमाउंटसह दिला जाईल.

(वाचा - खरंच सरकार तुमचे WhatsApp कॉल, मेसेज चेक करणार?वाचा त्या व्हायरल मेसेजमागचं सत्य)

गुगलने काही बग्स, त्रुटी मोजल्याही आहेत, ज्या या रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत कव्हर आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, काही नॉन-अँड्रॉईड त्रुटी, ज्या अँड्रॉईड सिक्योरिटीसाठी कमकुवत आहे, तेदेखील या रिवॉर्ड प्रोग्राम अंतर्गत घेतले जाऊ शकतात. गुगलने या बिटा वर्जनसाठी एक डिव्हाईस लिस्टही दिली आहे.

>> Pixel 5

>> Pixel 4a

>> Pixel 4a 5G

>> Pixel 4

>> Pixel 4 XL

>> Pixel 3a

>> Pixel 3a XL

>> Pixel 3

>> Pixel 3 XL

First published:

Tags: Google, Tech news