Amazon-Flipkart ला टक्‍कर; दुकानदारांनी 100 शहरांत नेमले ई-कॉमर्स वॉरियर्स

Amazon-Flipkart ला टक्‍कर; दुकानदारांनी 100 शहरांत नेमले ई-कॉमर्स वॉरियर्स

छोट्या व्यापाऱ्यांनी ई-कॉमर्स कंपन्याचा सामना करण्यासाठी आपली नीति ठरवली आहे. त्या अंतर्गत या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ई-कॉमर्स पोर्टल भारत ई-मार्केट (Bharat e-market) काही दिवसांपूर्वीच लाँच केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या (E-Commerce Companies) उत्पादित किमतीपेक्षा स्वस्त किमतीला वस्तू विकण्यासाठी सेल आयोजित करतात. त्यामुळे सगळा ग्राहक त्यांच्याकडे आकर्षित होतो. यामुळे छोटे व्यापारी (Small Traders) आणि कंपन्या यांचं कंबरडं मोडलं आहे. आता या छोट्या व्यापाऱ्यांनी या कंपन्यांचा सामना करण्यासाठी आपली नीति ठरवली आहे. त्या अंतर्गत या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ई-कॉमर्स पोर्टल भारत ई-मार्केट (Bharat e-market) काही दिवसांपूर्वीच लाँच केलं. ते लवकच अधिकृतरित्या क्रियाशील होईल. त्याचबरोबर देशातल्या 100 महत्त्वाच्या शहरांत स्थानिक व्यापारी नेत्यांना ई-कॉमर्स वॉरियर्स (E-Commerce Warriors) म्हणून तैनात केलं आहे. हे वॉरियर्स स्थानिक दुकानदारांना भारत-ई-मार्केट पोर्टलवर ई-शॉप सुरू करायला प्रोत्साहित करतील.

E-Commerce Warriors असं करणार काम -

हे E-Commerce Warriors स्थानिक व्यापाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतील. प्रत्येक ठिकाणच्या व्यापारी संघटनांसोबत काम करा असं यांना सांगितलं आहे. तंत्रज्ञानाच्या आधारे नव्या व्यापाऱ्यांना बीईएम वेबसाइटशी जोडणं हे त्यांचं काम असेल. 11 मार्च 2021 ला कॅटनी दिल्लीत वंडर ऑनबोर्डिंग अ‍ॅप लाँच केलं आहे. त्या अ‍ॅपवरून दुकानदार या साइटशी जोडले जाऊ शकतात. आतापर्यंत 1 लाखांहून अधिक व्यापारी या अ‍ॅपवरून वेबसाइटशी जोडले गेले आहेत.

(वाचा - केवळ 20 हजार रुपयांत सुरू करा हा व्यवसाय; महिन्याला होईल बक्कळ कमाई)

प्रत्येक राज्यात लाँच करणार नोंदणी अ‍ॅप -

कॅटचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल म्हणाले की, एप्रिल 2021 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिल्लीसह सर्व राज्यांच्या राजधान्यांत एकावेळी वापरकर्ता नोंदणी अ‍ॅप लाँच केलं जाईल आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी मे 2021 पर्यंत भारत-ई-मार्केट अ‍ॅप डाउनलोड केलं जाईल. डिसेंबर 2021 पर्यंत 7 लाख व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट कॅटनी ठरवलंय. त्याचदरम्यान देशात 40 हजार व्यापारी संघटना (Trade Federations) सुरू केल्या जाणार आहेत.

ई-कॉमर्स कंपन्यांवर आहेत हे आरोप -

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सरकारी नियमांची पायमल्ली करत असल्याचा आरोप व्यापारी संघटना कॅटने केला आहे. या विदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतातील व्यापाऱ्यांनीही कंबर कसली आहे. कोरोना काळात ऑनलाईन खरेदी वाढली आहे, त्यामुळे स्थानिक दुकानदार व्यापारी यांना ऑनलाइन मार्केटमध्ये येणं बंधनकारक झालं आहे. कॅट लवकरच ई-कॉमर्स वेबसाइट भारत ई-मार्केट सुरू करणार आहे.

बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली की, ग्राहकांचा फायदा होतो. त्यांना स्वस्त आणि दर्जेदार माल मिळतो. या प्रचंड कंपन्या आणि स्थानिक व्यापारी यांच्यातील या आर्थिक युद्धाचा फायदा सामान्य ग्राहकाला झाला तर ते नक्कीच उत्तम होईल. ग्राहक म्हणून या प्रयत्नांचं स्वागतच केलं पाहिजे.

First published: March 31, 2021, 10:14 PM IST

ताज्या बातम्या