मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /ZOOM कॉलवरील मिटिंगचा वैताग आलाय; अशी करा स्वतःची सुटका

ZOOM कॉलवरील मिटिंगचा वैताग आलाय; अशी करा स्वतःची सुटका

अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं असून या कंपन्या देखील या टूल्सचा वापर दैनंदिन कामांसाठी करत आहेत. यात झूम (Zoom) हे अ‍ॅप अधिक चर्चेत आलं असून, मिटिंग्जसाठी त्याचा मोठा प्रमाणात वापर केला जात आहे.

अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं असून या कंपन्या देखील या टूल्सचा वापर दैनंदिन कामांसाठी करत आहेत. यात झूम (Zoom) हे अ‍ॅप अधिक चर्चेत आलं असून, मिटिंग्जसाठी त्याचा मोठा प्रमाणात वापर केला जात आहे.

अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं असून या कंपन्या देखील या टूल्सचा वापर दैनंदिन कामांसाठी करत आहेत. यात झूम (Zoom) हे अ‍ॅप अधिक चर्चेत आलं असून, मिटिंग्जसाठी त्याचा मोठा प्रमाणात वापर केला जात आहे.

    नवी दिल्ली, 17 मार्च : मागील वर्षापासून कोरोनामुळे अनेकांच्या जीवन पध्दतीत अनेक बदल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासन, प्रशासनाने अनेक निर्बंध घातल्याने लोकांच्या थेट संपर्कावर काहीशा मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे नातेवाईक, मित्रमंडळीशी संपर्कात राहण्यासाठी व्हिडीओ कॉलिंगसारखे टूल्स वापरण्याकडे कल वाढला आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य दिलं असून या कंपन्या देखील या टूल्सचा वापर दैनंदिन कामांसाठी करत आहेत. यात झूम (Zoom) हे अ‍ॅप अधिक चर्चेत आलं असून, मिटिंग्जसाठी त्याचा मोठा प्रमाणात वापर केला जात आहे.

    परंतु, आता या अ‍ॅपचा वापर करताना म्हणजेच मिटिंग्जवेळी अनेकदा कंटाळवाणं वाटू लागतं. अशा नकोशा वेळी जर रडणाऱ्या बाळाचा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं, ध्वनी लहरी, बांधकामांचा आवाज, प्रतिध्वनी आणि नैसर्गिक विविध आवाज तुमच्या मागे होत आहेत असं भासवून तुम्ही या मिटिंग्जमधून काही काळ निसटू शकलात तर? होय, हे देखील आता शक्य होणार आहे. यासाठी झूम एस्केपर (Zoom Escaper) हे नवं विनामूल्य विजेट (Widget) वेबवर उपलब्ध आहे.

    (वाचा - 'एसएमएस'साठी नवे नियम; काय आहे SMS Scrubbing? तुम्हाला कसा होणार फायदा)

    सॅम लॅविग्ने (Created by artist Sam Lavigne) या कलाकाराने तयार केलेलं झूम एस्केपर अ‍ॅप वापरण्यास अगदी सुलभ आहे. यासाठी युजरला व्हि-बी ऑडिओ (V-B Audio) नावाचं एक विनामूल्य ऑडिओ सॉफ्टवेअर (Audio Software) डाऊनलोड करावं लागेल. या सॉफ्टवेअरमुळे युजरला त्याचा ऑडिओ बदलता येणार आहे. त्यानंतर झूममध्ये आपले ऑडिओ इनपूट आपल्या मायक्रोफोन व्हिबी ऑडिओमध्ये बदलून प्ले (Play) करता येणार आहे, असं व्हर्जच्या वृत्तात म्हटलं आहे.

    (वाचा - Covid-19 Vaccination: लसीकरणासाठी घरबसल्या करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन; बुक करा स्लॉट)

    जर तुम्हाला झूम एस्केपर पुरेसे वाटत नसेल, तर लॅविग्ने झूम डिलीटरची निर्मिती केली आहे, हे देखील तुम्ही वापरु शकता. हा एक प्रोग्रॉम (Small Programme) असून तो तुमच्या मेन्यू अथवा सिस्टीमधून रन होईल. हे कम्पूटरवरील झूमवर तुमची उपस्थिती सातत्याने तपासेल. तुमची उपस्थिती तिथे दिसली, तर ती त्वरित हटवण्याचं काम करेल. बाळाच्या रडण्याचा आवाज हा झूम मिटींग्जमधून तात्पुरती रजा घेण्यासाठी महत्वाचं कारण ठरू शकतो. असेच काही आवाज झूम मीटिंग्जमधील इतरांना ऐकवून तुम्ही मीटिंगमधून छोटी सुट्टी घेऊ शकता. परंतु, घरात लहान बाळ आहे असं भासवताना यातून तुमच्या घरी लहान बाळ आहे याची खात्री तुमच्या सहकाऱ्यांना पटली पाहिजे, हे देखील महत्वाचं आहे.

    First published:

    Tags: Tech news