Home /News /technology /

TikTok ने भारतात बंद केला आपला व्यवसाय; 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं, मेलद्वारे दिली माहिती

TikTok ने भारतात बंद केला आपला व्यवसाय; 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं, मेलद्वारे दिली माहिती

कंपनीने आपल्या निर्णयाबाबत टीमला माहिती दिली असून या निर्णयामुळे भारतातील सर्व कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या भारतातील वापसीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली आहे.

  नवी दिल्ली, 27 जानेवारी : टिकटॉकची (Tiktok) पॅरेंट कंपनी बाईटडान्सने (ByteDance) भारतात आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली आहे. गुडगाव स्थित कंपनीने भारतात आपला व्यवसाय जवळपास बंद केला आहे. भारतात टिकटॉक आणि हॅलो अ‍ॅप स्वामित्व असलेल्या या कंपनीच्या सेवांवर बंदी आहे. टिकटॉकचे प्रमुख वेनेसा पाप्पस आणि ग्लोबल बिझनेस सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष ब्लेक चांडली यांनी कर्मचाऱ्यांना ई-मेल करून याबाबत माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या निर्णयाबाबत टीमला माहिती दिली असून या निर्णयामुळे भारतातील सर्व कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होणार आहे. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या भारतातील वापसीबद्दल अनिश्चितता व्यक्त केली आहे. बाईटडान्सने आपल्या 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या संपूर्ण सेल्स टीमला कंपनी सोडण्याबाबत सांगण्यात आलं आहे. परंतु, काही आंतरराष्ट्रीय कामात मदत करणाऱ्या टीमसहित महत्वाच्या प्रकल्पांवर काम करणारे कर्मचारी अद्यापही कार्यरत आहेत. कंपनीने काढलेल्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यांचा पगार देण्याचं सांगितंल असल्याची माहिती आहे.

  (वाचा - कोरोना वॅक्सिनच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान; आधार-OTP शेअर करू नका)

  भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व आदेशांचं 29 जून 2020 पासून पालन करण्यात येत असल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. तसंच, गेल्या सात महिन्यांपासून आमच्या अथक प्रयत्नांनंतरही आमचं अ‍ॅप कसं आणि कधी सुरू केलं जाईल, याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. भारतात आमच्या 2000 हून अधिक कर्मचाऱ्यांना अर्ध्या वर्षाहून अधिक काळ राखून ठेवल्यानंतरही, आता कामगार संख्या कमी करण्याशिवाय पर्याय नाही, ही खेदाची बाब असल्याचंही ते म्हणाले.

  (वाचा - बापरे! बॅन होऊन अद्यापही वापरलं जातंय TikTok,भारतीयांकडून होतोय या Appचा वापर)

  दरम्यान, भारतात टिकटॉकसह 58 चिनी अ‍ॅपवर कायमस्वरुपी बंदी घालण्याची तयारी असल्याची माहिती आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतात या अ‍ॅप्सवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या अ‍ॅपवर बंदी घातली जाईल, त्यात टिकटॉकसह इतर 58 अ‍ॅप्सचा समावेश आहे. त्यामुळेच बाईटडान्सने भारतातून आपला गाशा गुंडाळण्याचा निर्णय घेतल्याचं कारण सांगितलं जात आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Tiktok

  पुढील बातम्या