TikTok डाऊनलोडसाठी तुम्हालाही आला मेसेज तर सावधान राहा, पडाल मोठ्या संकटात

TikTok डाऊनलोडसाठी तुम्हालाही आला मेसेज तर सावधान राहा, पडाल मोठ्या संकटात

सरकारने या चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी अनेक लोकांना एक संशयास्पद SMS आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : सगळ्यात प्रसिद्ध व्हिडिओ मेकिंग अ‍ॅप TikTok वर भारतात बंदी घातण्यात आली आहे. सरकारने या चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता लोकांना फसवण्यासाठी वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी अनेक लोकांना एक संशयास्पद SMS आले आहेत. ज्यामध्ये टिकटॉक भारतात पुन्हा सुरू झालं आहे असं लिहिण्यात आलं आहे. या मेसेजमध्ये TikTok Pro नावाच्या apk फाइलची लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे हा अॅप वापरण्यासाठी लोक ही लिंक फोनमध्ये डाउनलोड करतात. पण असं केल्याने तुमच्या फोनमधील डेटा आणि वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो.

'TikTok भारतात परत आला आहे. नवीन वैशिष्ट्यांसह आता क्रिएटिव्ह व्हिडिओ तुम्ही पुन्हा तयार करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून TikTok v1 डाउनलोड करा. या मेसेजला एक लिंक जोडली आहे. जी एकApk फाइल आहे. या लिंकवर क्लिक केल्याने Apk अ‍ॅपचं स्टोअर उघडलं जातं, तिथून लोक खोटं टिकटॉक खरं समजून डाऊनलोड करत आहेत.

दज्या लोकांनी या लिंकवर क्लिक केलं आहे. त्यांना एका हिडन अॅप डाऊनलोडची परवाणगी विचारली जाते. यानंतर, जेव्हा वापरकर्ता सेटिंग वर जातो, आणि परवाणगी देण्याच्या बटणावर क्लिक करतो. यानंतर मात्र हा अॅप तुमच्या फोनमधील सगळा डेटा वाचू शकतो.

व्हॉट्सअॅपवर शूट केला तरुणाचा NUDE व्हिडिओ, महिलेने ब्लॅकमेल करून उकळले पैसे

फोनसाठी ही Apk फाइल्स धोक्याची आहे

समोर आलेल्या माहितीनुसार, जे लोक ही Apk फाइल डाऊनलोड करतात. त्यांचा वैयक्तिक डेटा हा धोक्यात आहे. जेव्हा-जेव्हा एखादी फाईल अधिकृतपणे उपलब्ध नसते आणि आपण त्याची Apk फाइल वापरत अशतो, तेव्हा त्यात काय बदल केले गेले आहेत हे आपल्याला सापडत नाही. याचा अर्थ असा होतो की, ही फाइल सहजपणे आपल्या फोनमध्ये इतर डेटा वापरते. यातून मोठी फसवणूक होण्याचाही धोका असतो. त्यामुळे तुम्हालाही जर असा मेसेज आला असेल तर सावधान राहा.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 30, 2020, 2:55 PM IST

ताज्या बातम्या