Home /News /technology /

WhatsApp वर अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकल्यास बसेल मोठा आर्थिक फटका, अशी होतेय फसवणूक

WhatsApp वर अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकल्यास बसेल मोठा आर्थिक फटका, अशी होतेय फसवणूक

अनेकजण आपल्या मेसेंजरमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या मदतीने एक अ‍ॅप आपोआप डाउनलोड होतं. याच लिंकद्वारे हॅकर्सकडून मोठी फसवणूक केली जाते.

  नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : सोशल मीडियावर अनेक जण विविध प्लॅटफॉर्मवरुन कनेक्ट असतात. अनेक जण विविध गोष्टी शेअरही करत असतात. पण तुमच्या या अ‍ॅक्टिव्हिटीवर हॅकर्सचीही नजर असू शकते, जे तुमची पर्सनल माहिती चोरी करू शकतात. कोरोना काळात हॅकिंगच्या प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. परंतु नुकतंच व्हॉट्सअ‍ॅपबाबत एक प्रकरण समोर आलं असून याद्वारे अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकवून फसवणूक केली जात आहे. अनेकजण आपल्या मेसेंजरमध्ये आलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करतात. लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याच्या मदतीने एक अ‍ॅप आपोआप डाउनलोड होतं. याच लिंकद्वारे हॅकर्सकडून मोठी फसवणूक केली जाते. हॅकर्स इन्स्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करतात. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्यास सांगतात. युजरने त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये आपोआप BOTIM अ‍ॅप डाउनलोड होतं. हे अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर हॅकर्स खासगी माहिती चोरी करतात. ज्यात फोन नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती सामिल असते.

  SMS,मेल,सोशल मीडिया..कसाही होऊ शकतो Online Fraud,बचावासाठी लक्षात ठेवा या गोष्टी

  पर्सनल कॉन्टॅक्ट मिळवल्यानंतर हॅकर्स थेट व्हॉट्सअ‍ॅपवर कॉन्टॅक्ट करतात. आपलं अकाउंट हॅक झालं असल्याचं समजेपर्यंतच हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करण्यास सुरुवात करतात. युजरकडे पैशांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल केला जाण्याची धमकी दिली जाते. सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फेक वेबसाईट्स आहे, ज्यावर क्लिक केल्यावर स्पॅम लिंक मिळतात. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक प्रोसेस सांगितली जाते. त्यानंतर हॅकर्स अ‍ॅप लिंकद्वारे युजरच्या फोनमध्ये एन्ट्री करतात. त्यामुळे कोणत्याही नंबरवरुन आलेल्या लिंकवर क्लिक करू नका. कोणीही अशा प्रकारे मेसेज केल्यास त्याची तक्रार करा, इन्स्टाग्राम प्रोफाईल रिपोर्ट करा. अन्यथा हॅकर्सच्या जाळ्यात अडकून मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news, Whatsapp alert, WhatsApp user

  पुढील बातम्या