मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवी कार घ्यायची आहे? Maruti Alto वर हजारोंची सूट; जाणून घ्या ऑफर

नवी कार घ्यायची आहे? Maruti Alto वर हजारोंची सूट; जाणून घ्या ऑफर

Maruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते.

Maruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते.

Maruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 मे: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki), आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मारुती अल्टोवर कारवर जबरदस्त डिस्काउंट जारी केला आहे. मारुती सुझुकीने दिलेल्या माहितीनुसार, या कार खरेदीवर 35 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मारुती या कारची विक्रीची Arena प्लॅटफॉर्मवरुन करू शकते. त्याशिवाय मारुती आपल्या लग्जरी कार्सची विक्री Nexa प्लॅटफॉर्मवरुन करते.

Maruti Alto -

कंपनीने या कारमध्ये 796 cc क्षमतेच्या 3 सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 48PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन गियरबॉक्ससह येतं. याचं पेट्रोल मॉडेल 22 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देतं, तर सीएनजी वेरिएंट 31.59 किलोमीटर प्रति किलोग्रामपर्यंत मायलेज देतं.

(वाचा - जगातली सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक कार, Tesla Model S Plaid लवकरच लॉन्च)

कंपनी या सर्वाधिक लोकप्रिय कारचं नेक्स्ट जनरेशनही मार्केटमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे. परंतु याबाबत कंपनीकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट शेअर करण्यात आलेलं नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉडेलची नेक्स्ट जनरेशन कार, कंपनी यावर्षाअखेरीस लाँच करू शकते.

(वाचा - Tyres साठीचा नवा नियम, ऑक्टोबरपासून होणार लागू; तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा)

Maruti Alto भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कमी बजेटमुळे अनेकांची या कारला पसंती असते. या कारची किंमत 2.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होऊन 4.48 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत आहे.

First published:

Tags: Car, Maruti suzuki cars