कोरोनापासून वाचवणार WhatsApp चं हे नवं फीचर; जाणून घ्या कसा कराल वापर

कोरोनापासून वाचवणार WhatsApp चं हे नवं फीचर; जाणून घ्या कसा कराल वापर

नवीन फीचरमुळे बिझनेस करणाऱ्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवरून खरेदी करणाऱ्या युजर्सनादेखील मोठा फायदा होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 9 डिसेंबर : मेसेजिंग फ्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर (Whatsapp) विविध अपडेट फीचर्स येत असतात. कंपनी आपल्या युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन, नवीन फीचर्स आणत असते. आता व्हॉट्सॲपने कार्ट (CART) हे नवं फीचर लाँच केलं आहे. कोरोना काळात अनेक जण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळतात. त्यामुळे घरबसल्या वस्तू ऑर्डर करण्यासाठी whatsapp ने cart फीचर लाँच केलं आहे. इतर ई-कॉमर्स वेबसाईटवर (e-commerce website) असणाऱ्या add to cart या फीचरप्रमाणेच हे फीचर आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून बिजनेस व्हॉट्सॲपवरून (Business Whatsapp) काहीही खरेदी करण्यासाठी या फीचरची मोठी मदत होणार आहे. मागील महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपने बिझनेस प्रोफाइलवर शॉपिंग बटण आणलं होतं. याद्वारे युजर्स ऑफर कॅटलॉग पाहू शकतात.

या नवीन फीचरमुळे बिझनेस करणाऱ्या नागरिकांना मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर व्हॉट्सॲपवरून खरेदी करणाऱ्या युजर्सनादेखील मोठा फायदा होणार आहे. या नवीन फीचरमुळे बिझनेस ऑर्डर चौकशीचा मागोवा (Track of enquiry) ठेवणं, ग्राहकांकडून आलेल्या मागण्यांचं नियोजन करणं आणि विक्री थांबवणं सुलभ होणार आहे. एकाहून अधिक वस्तू खरेदी करत असल्यास कार्ट (CART) हा पर्याय उपयुक्त असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

(वाचा - बाईकवरून प्रवास करण्याच्या नियमात बदल; आता हे नियम पाळावेच लागणार)

कार्ट वापरण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. सुरुवातीला तुम्हाला जिथून खरेदी करायची आहे, त्या चॅट किंवा बिझनेस या पर्यायावर क्लिक करा. त्यांची यादी पाहण्यासाठी ऑर्डर फ्रॉम पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला हव्या असणाऱ्या वस्तूवर क्लिक करून, Add to cart करू शकता. यामध्ये विविध वस्तू खरेदी करून, त्या कार्टमध्ये टाकून त्याची यादी तुम्ही विक्री करणाऱ्याला पाठवू शकता. यात VIEW CART या पर्यायावर क्लिक करून, तुमच्या ऑर्डरला ट्रॅक करू शकता.

(वाचा -  WhatsApp वर Delete केलेला मेसेजही वाचता येणार; ही आहे ट्रिक)

दरम्यान, आजपासून हे फीचर जगभरातील सर्व युजर्ससाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. त्याचबरोबर या फीचरचा वापर करण्यासाठी व्यवसायांनी त्यांचा बिझनेस कॅटलॉग (Business Catalogue) लाइव्ह करणं आवश्यक आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दररोज 175 मिलियन नागरिक व्हॉट्सॲप बिझनेसचा वापर करतात, तर भारतात दर महिन्याला 3 कोटी नागरिक बिझनेस कॅटलॉगला भेट देत असतात.

Published by: Karishma Bhurke
First published: December 9, 2020, 12:32 PM IST

ताज्या बातम्या