Home /News /technology /

TRAI च्या या नियमामुळे डिअ‍ॅक्टिवेट होऊ शकतं सिम कार्ड; जाणून घ्या कसं कराल रिअ‍ॅक्टिवेट

TRAI च्या या नियमामुळे डिअ‍ॅक्टिवेट होऊ शकतं सिम कार्ड; जाणून घ्या कसं कराल रिअ‍ॅक्टिवेट

सध्या या नियमांतर्गत अनेक नंबर डिअ‍ॅक्टिवेट होत आहेत. अधिकतर लोकांनी दोन नंबर उपयोगासाठी ठेवलेले असतात, पण त्यापैकी एकाच नंबरचा अधिक वापर होता आणि दुसरा नंबर वापर नसल्याने डिअ‍ॅक्टिवेट होतो.

  नवी दिल्ली, 19 डिसेंबर : TRAI च्या नियमांनुसार, प्रीपेड मोबाईल युजरला आपल्या सिममधून कमीत-कमी 20 रुपयांचा बॅलेन्स मेन्टेन करावा लागेल. असं न केल्यास, सिम ऑपरेटर कंपनी नंबर डिअ‍ॅक्टिवेट करू शकते. त्याशिवाय, सलग 90 दिवसांपर्यंत आपल्या सिम कार्डमधून कोणताही कॉल, एसएमएस, व्हॉईस-व्हिडीओ कॉल किंवा डेटाचा वापर न केल्यासही सिम डिअ‍ॅक्टिवेट होऊ शकतं. TRAI ने हा नियम 2013 मध्ये बनवला होता. सध्या या नियमांतर्गत अनेक नंबर डिअ‍ॅक्टिवेट होत आहेत. अधिकतर लोकांनी दोन नंबर उपयोगासाठी ठेवलेले असतात, पण त्यापैकी एकाच नंबरचा अधिक वापर होता आणि दुसरा नंबर वापर नसल्याने डिअ‍ॅक्टिवेट होतो. अशाप्रकारे डिअ‍ॅक्टिवेट झालेला नंबर पुन्हा रिअ‍ॅक्टिवेट करता येऊ शकतो.

  (वाचा - आधी 3 मिनिटांत एक इनोवा बनत होती, आता 2.5 मिनिटांचं टार्गेट; कर्मचारी संपावर)

  डिअ‍ॅक्टिवेटनंतर 15 दिवसांचा ग्रेस पीरियड -

  सिम डिअ‍ॅक्टिवेट झाल्यास, ते 15 दिवसांच्या आत पुन्हा रिअ‍ॅक्टिवेट करू शकता. त्यासाठी 20 रुपयांचा खर्च येतो. त्यानंतर सिम पुन्हा रिअ‍ॅक्टिवेट होईल.

  (वाचा - पंतप्रधानांचं कार्यालयच OLX वर विक्रीला टाकलं, 4 जण ताब्यात)

  BSNL युजर्ससाठी - BSNL चं सिम कार्ड डिअ‍ॅक्टिवेट झाल्यास, सर्वात आधी BSNL कस्टमर केयरद्वारे रिअ‍ॅक्टिवेट करण्याची रिक्वेस्ट पाठवावी लागेल, किंवा BSNL स्टोरमध्ये जाऊन रिअ‍ॅक्टिवेशन रिक्वेस्ट सबमिट करू शकता. त्यासोबत फोटो आयडी प्रुफ द्यावा लागेल. त्यानंतर एक कन्फर्मेशन कॉल येईल आणि नंबर रिअ‍ॅक्टिवेट होईल.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या