Home /News /technology /

उद्यापासून वापरता येणार नाहीत हे Smartphone, पाहा काय आहे कारण

उद्यापासून वापरता येणार नाहीत हे Smartphone, पाहा काय आहे कारण

कंपनीने आपल्या जुन्या सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना इशारा दिला आहे. जे युजर्स अद्यापही जुन्या सॉफ्टवेयरचा वापर करतात, कंपनीने अशा स्मार्टफोन मॉडेल्सवर सपोर्ट देणं बंद केलं आहे.

  नवी दिल्ली, 3 जानेवारी : सध्याच्या काळात iPhone कडे एक स्टेटस सिम्बोल म्हणून पाहिलं जातं. पण 2000 च्या सुरुवातीला असाच काहीसा प्रकार ब्लॅकबेरी स्मार्टफोनचा होता. त्यावेळी ब्लॅकबेरी सर्वात चांगला स्मार्टफोन समजला जात होता. ब्लॅकबेरीच्या जुन्या स्मार्टफोनवर (Blackberry) कंपनी आतापर्यंत सपोर्ट देत होती. परंतु आता कंपनी आपल्या जुन्या स्मार्टफोनवर सपोर्ट देणं बंद करणार आहे. कंपनीने आपल्या जुन्या सॉफ्टवेयरवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांना इशारा दिला आहे. जे युजर्स अद्यापही जुन्या सॉफ्टवेयरचा वापर करतात, कंपनीने अशा स्मार्टफोन मॉडेल्सवर सपोर्ट देणं बंद केलं आहे. या मॉडेल्सवर बंद होणार सपोर्ट - कंपनीने अधिकृतपणे घोषणा करत सांगितलं, की कंपनी आता ब्लॅकबेरी OS, 7.1 OS, प्लेबुक ओएस 2.1 सीरीज आणि ब्लॅकबेरी 10 वर चालणाऱ्या स्मार्टफोनवर सपोर्ट बंद करणार आहे. या सॉफ्टवेयरचा वापर करणाऱ्या युजर्सला कंपनीने सपोर्ट करण्याचा इशारा दिला आहे. या स्मार्टफोनवर कॉल्स, सेल्युलर डेटा, SMS आणि इमरजेंसी कॉलसारखे बेसिक फंक्शन्सदेखील काम करणं बंद करतील. कंपनी या मॉडेल्सवर अधिकृतपणे 4 जानेवारी 2022 पासून सपोर्ट बंद करणार आहे. WhatsAppचा युजर्सना झटका! 17 लाखांपेक्षा जास्त भारतीयांचं अकाउंट केलं ब्लॉक ब्लॅकबेरी अँड्रॉइड डिव्हाइस - कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जे डिव्हाइस अँड्रॉइडवर काम करतात, त्यांना सपोर्ट मिळत राहील. परंतु ज्यांना स्मार्टफोन अँड्रॉइड नसेल त्यांना सपोर्ट मिळणार नाही.

  Google अकाउंटशी लिंक आहे नको असलेले apps? 'या' पद्धतीने करा डिलीट!

  दरम्यान, 2007 मध्ये Apple ने निश्चित रुपात स्मार्टफोन इंडस्ट्रीचा कायापालट केला. अनेक स्मार्टफोन कंपन्यांना Apple स्मार्टफोन इंडस्ट्रीवर इतका प्रभाव टाकेल याचा अंदाजही नव्हता. ब्लॅकबेरी मॅन्युफॅक्चररकडूनही टच स्मार्टफोनवर, विना की-पॅड स्मार्टफोनव विश्वास ठेवण्यात आला नव्हता. परंतु युजर्सने टचफोन स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आणि iPhone प्रसिद्ध झाला. iPhone नंतर ब्लॅकबेरीची व्हॅल्यू मार्केटमध्ये कमी झाली. अनेक कंपन्या सॅमसंगसह इतर ब्रँडही मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी टचस्क्रिन स्मार्टफोनकडे वळले. परंतु ब्लॅकबेरी जुन्या स्मार्टफोनसह मार्केटमध्ये होता. आता कंपनीने सपोर्ट बंद केल्यानंतर युजर्सने त्यांच्या फोनचा डेटा बॅकअप घेणं गरजेचं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone, Tech news

  पुढील बातम्या