Home /News /technology /

World Smallest Car : जगातली सगळ्यात छोटी कार, एक लिटर पेट्रोलमध्ये चालते इतके किलोमीटर

World Smallest Car : जगातली सगळ्यात छोटी कार, एक लिटर पेट्रोलमध्ये चालते इतके किलोमीटर

ब्रिटनमधील ससेक्समध्ये राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑर्चिन याच्याकडे जगतील सर्वांत लहान आकाराची कार (World’s Smallest Car) आहे. तो ती रोज वापरतोही. 2010 मध्ये या कारला जगातली सर्वांत लहान आकाराची कार म्हणून घोषित करण्यात आलं आणि तिचा समावेश गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (guinness book of world record) करण्यात आला.

पुढे वाचा ...
मुंबई, 10 मे : मराठीत ‘हौसेला मोल नाही’ असं म्हटलं जातं. एखाद्या व्यक्तीचा छंद, आवड काहीही असू शकतो आणि त्याच मोल कुठल्याच गोष्टीशी तुलना करता येण्यासारखं नसतं असा याचा अर्थ आहे. अशाच जगभरातील वेगळ्या, अतुल्य, अद्वितीय वस्तू, घटना, व्यक्तींची कौशल्यं, विक्रम असे अनेक प्रकार गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदवली जातात. तुम्ही आतापर्यंत अनेक कार पाहिल्या असतील. पण जगातील आकाराने सर्वांत छोटी कार तुम्ही पाहिली आहे का? असं विचारलं तर खूप कमी जणं हो म्हणतील. ब्रिटनमधील ससेक्समध्ये राहणाऱ्या अ‍ॅलेक्स ऑर्चिन याच्याकडे जगतील सर्वांत लहान आकाराची कार (World’s Smallest Car) आहे. तो ती रोज वापरतोही. अशी आहेत वैशिष्ट्य अ‍ॅलेक्सच्या या कारचं नाव आहे Peel P50. या कारची लांबी 134 सेंटिमीटर, रूंदी 98 सेंटिमीटर आणि उंची 100 सेंटिमीटर आहे. तो ही कार रोज वापरतो आणि पेट्रोलचा विचार केला तर इतर कारच्या तुलनेत ही किफायतशीरही असल्याचं तो सांगतो. अ‍ॅलेक्सची उंची 6 फूट आहे त्यामुळे तो या कारमध्ये बसताना किंवा त्यातून उतरताना रस्त्यावरचे लोक त्याच्याकडे आ वासून बघतच राहतात असं त्यानी सांगितलं. या कारमध्ये 4.5 हॉर्सपॉवरचं इंजिन आहे आणि एक लिटर पेट्रोलमध्ये ती 42 किलोमीटर धावते. पील इंजिनीअरिंग कंपनीने ही कार तयार केली आहे. 1962 ते 1965 या काळात पहिल्यांदा ही कार तयार करण्यात आली. 2010 मध्ये कंपनीने पुन्हा या कारचं उत्पादन सुरू केलं. कारची किंमत आहे एवढी अ‍ॅलेक्सनी सांगितलं की, तो कारमधून जिथे-जिथे जातो तिथे-तिथे रस्त्यावरचे लोक मागे वळून-वळून त्याच्या कारकडे पाहतात. 2010 मध्ये या कारला जगातली सर्वांत लहान आकाराची कार म्हणून घोषित करण्यात आलं आणि तिचा समावेश गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये (guinness book of world record) करण्यात आला. ही नवी कार घ्यायची असेल तर ती 84 लाख रुपयांहून अधिक किमतीला घेता येते. कारची किंमत एवढी आहे, म्हणून मी सेकंड हँड पी 50 कार विकत घेतली आहे. या कारचा जास्तीतजास्त वेग ताशी 37 किमी आहे आणि याच कारने मी गेल्यावर्षी संपूर्ण ब्रिटन फिरून आलो आहे, असं अ‍ॅलेक्स म्हणाला. खरोखरच हौसेला मोल नसतं हे तुम्हाला पटलं असेल कारण एवढ्या लहान कारसाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणारा कुणी हौशीच असू शकतो.
First published:

पुढील बातम्या