Home /News /technology /

Aadhaar लिंक मोबाईल नंबर विसरलात; घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असा शोधा

Aadhaar लिंक मोबाईल नंबर विसरलात; घरबसल्या फक्त 2 मिनिटांत असा शोधा

घर बसल्या तुम्हाला तुमचा आपला Aadhaar रजिस्टर मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी चेक करता येतो.

    नवी दिल्ली, 27 एप्रिल : 10 वर्षांपूर्वीच आधार कार्ड (Aadhaar card)  सगळ्यासाठी अनिवार्य झालेलं आहे. अगदी लहान मुलांनाही आधार कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे आधार कार्डच महत्त्व आपण सगळे चांगल्या रितीने जाणतो. आपला आधार नंबर मोबाईल नंबरशी जोडला गेला असतो, त्यामुळे आपल्याशी सहज संपर्क करता येतो आणि आधारशी संबंधित सर्व ओटीपी (OTP) आणि एसएमएस (SMS) अलर्ट देखील याच रजिस्टर मोबाइल नंबरवर येतात. आधार नोंदणी करताना दिलेला मोबाइल नंबर (Mobile Number ) किंवा ईमेल आयडी (Email ID) विसरण्याची शक्यता असते. मोबाईल नंबर विसरल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. आधारला लिंक असणारा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी विसरल्यास घरबसल्यासही तो शोधता येतो. (कोरोनामुळे चैत्र पौर्णिमेला जेजुरी सुनी सुनी; गडावर फुलांची सजावट; पहा Photo) सर्वात आधी www.uidai.gov.in या वेबसाईटवर जा मग आधार टॅबमध्ये ईमेल/ मोबाईल नंबर व्हेरिफीकेशन ऑप्शन सिलेक्ट करा. सिलेक्शन केल्यावर नवीन पेज येईल. या पेजवर आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यावा लागेल. जो मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे तो टाका. त्यानंतर स्क्रॅच कोड करून सेंड ओटीपीवर क्लिक करा. मोबाईल नंबरवर किंवा ईमेल आयडी ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तर त्यावर ओटीपी येईल. आता सूचनेप्रमाणे ओटीपी नंबर टाका. ("इरफान खानने माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला कारण...", कंगणा रणौतचा मोठा खुलासा) या प्रोसेसनंतर दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी मॅच होत असेल तर, स्क्रिनवर तसा मेसेज येईल. जर दुसरा नंबर किंवा ईमेल आयडी आधारबरोबर लिंक असेल तर मॅच होत नसल्याचा मेलेज येईल. यावरून कोणता नंबर किंवा ईमेल आयडी आधारला लिंक केला आहे हे समजेल. आता तुम्हाला  आधार कार्डला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी लिंक करायचा असेल तर, त्यासाठी आधार सेंटरलाच जावं लागेल. यासाठी ऑनलाईन लिंकिंग पद्धत नाही आहे. त्यासाठी कोणत्याही कायदपत्रांशिवाय बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावं लागेल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aadhar card, Aadhar card link, Aadhar card on phone, Digital services

    पुढील बातम्या