• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आपल्या Wi-Fi राउटरला सायबर हल्ल्यांपासून असं ठेवा सुरक्षित

आपल्या Wi-Fi राउटरला सायबर हल्ल्यांपासून असं ठेवा सुरक्षित

राउटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राउटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजरच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 एप्रिल : भारत आणि चीन विवादादरम्यान, भारत सरकारकडून 59 चिनी अ‍ॅप्स बॅन करण्यात आले. आयटी मंत्रालयाने, विविध स्त्रोतांकडून तक्रारी येत आहेत, ज्यात भारताबाहेरील सर्व्हरसाठी अनधिकृतपणे डेटा चोरी करुन अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर गैरवापर केल्याचा आरोप रिपोर्टमध्ये सामिल असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारला या आरोपांबाबत सविस्तर माहिती नसली, तरी सुरक्षेबाबत विचार करणारी ही बाब, जी भारतभर काम करणाऱ्या लोकांसाठी राउटरच्या (Router) रुपात मोठी समस्या ठरू शकते. राउटर का आवश्यक? राउटर इनकमिंग आणि आउटगोईंग ट्रॅफिक चेक करतं, हे एका गेटकीपर रुपात काम करतं. राउटर वायफाय (Wi-Fi) नेटवर्कपर्यंतचा प्रवेश नियंत्रित करतो आणि या माध्यमातून युजरच्या फोन, टॅबलेट, लॅपटॉप, डेस्कटॉप आणि इतर डिव्हाईसपर्यंत पोहचतो. जर एखाद्याला तुमच्या नेटवर्कमध्ये प्रवेश मिळवायचा असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या नेटवर्कशी कनेक्ट असलेल्या डिव्हाईसवर प्रवेश मिळवण्यात आणि कनेक्ट होण्यास वेळ लागणार नाही.

  (वाचा - इथे पोस्ट करा वॅक्सिनेशनचा फोटो आणि जिंका 5 हजार रुपये;वाचा भारत सरकारची खास ऑफर)

  राउटर सुरक्षित करता येऊ शकतं? राउटर सुरक्षित करता येऊ शकतं, त्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. Settings मध्ये Network and Internet मध्ये जावं लागेल. त्यानंतर View your Network Properties त्यानंतर DNS Servers > IP Address वेब ब्राउजरमध्ये कॉपी करावा लागेल. राउटरला सुरक्षित ठेवण्यासाठी चांगला-स्ट्राँग पासवर्ड (Password) सेट करावा लागेल. प्रत्येक राउटरला दोन पासवर्ड असतात, एक सेटिंग्ज आणि दुसरा WPA एक्सेस पासवर्ड. हे दोन्ही पासवर्ड बदलू शकता. हा पासवर्ड लक्षात ठेवावा लागेल, वायफाय राउटर एक्सेस करावा लागल्यास, पासवर्डची पुन्हा गरज लागते. त्यामुळे स्ट्राँग पासवर्ड ठेवून राउटर सुरक्षित ठेवता येऊ शकतं.
  Published by:Karishma Bhurke
  First published: