• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • डेस्कटॉपवर WhatsApp Video Call कसा कराल? सेटिंग्जमध्ये करा हे बदल

डेस्कटॉपवर WhatsApp Video Call कसा कराल? सेटिंग्जमध्ये करा हे बदल

WhatsApp मध्ये Two-factor Authentication हे फीचर अकाउंटला डबल लॉक सेट करतं. पहिल्या लेवलवर युजर आपल्या अकाउंटला फेस-लॉक, फिंगरप्रिंट लॉक किंवा कोड लॉकने सिक्योर करू शकता. आणि दुसऱ्या लेवलवर रजिस्टर्ड नंबर अ‍ॅड करू शकता.

WhatsApp मध्ये Two-factor Authentication हे फीचर अकाउंटला डबल लॉक सेट करतं. पहिल्या लेवलवर युजर आपल्या अकाउंटला फेस-लॉक, फिंगरप्रिंट लॉक किंवा कोड लॉकने सिक्योर करू शकता. आणि दुसऱ्या लेवलवर रजिस्टर्ड नंबर अ‍ॅड करू शकता.

WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेंजिंग अ‌ॅप्सपैकी एक आहे. या अ‌ॅपचं वैशिष्ट म्हणजे, केवळ मेसेजच नाही, तर ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलसाठीही हे अ‌ॅप वापरता येतं.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 जून : व्हॉट्सअ‌ॅपचं ‘व्हिडीओ कॉल’ (WhatsApp video call) एक उत्कृष्ट फीचर आहे. या माध्यमातून जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण व्हिडीओ कॉल करू शकतो. अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर हे फीचर उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‌ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेंजिंग अ‌ॅप्सपैकी एक आहे. या अ‌ॅपचं वैशिष्ट म्हणजे, केवळ मेसेजच (messages) नाही, तर ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलसाठीही हे अ‌ॅप वापरता येतं. अर्थात त्यासाठी इंटरनेट कनेक्शन (internet connection) असणं आवश्यक आहे. विशेष म्हणजे या अ‌ॅपचं फास्ट आणि सुरक्षित असं डेस्कटॉप व्हर्जनही तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने डाउनलोड करु शकता. किंवा मग, ‘व्हॉट्सअ‌ॅप वेब’वर असलेला स्कॅनिंग कोड तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या अ‌ॅपने स्कॅन करुनही तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर व्हॉट्सअ‌ॅप वापरू शकता. डेस्कटॉपवरूनही व्हिडीओ कॉल करता येतो. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. डेस्कटॉपवरून व्हिडिओ कॉल करण्यासाठी - - तुम्हाला ज्या व्यक्तिला व्हिडीओ कॉल करायचा आहे ते चॅट ओपन करा - आता व्हिडीओ कॉलच्या आयकॉनवर क्लिक करा. - तुम्हाला अधून-मधून कॉल म्यूट किंवा अनम्यूट करायचा असेल तर मायक्रोफोनवर क्लिक करा. - तुम्हाला कॅमेरा ऑफ किंवा ऑन करायचा असेल, तर कॅमेराच्या आयकॉनवर क्लिक करा. - कॉल संपवण्यासाटी एंड कॉल आयकॉनवर क्लिक करा. - कॉल स्वीकारण्यासाठी अक्सेप्ट कॉल बटनवर क्लिक करा. - येत असलेला कॉल कट करण्यासाठी डिक्लाईन कॉल बटनवर क्लिक करा. - येत असलेला कॉल इग्नोर करण्यासाठी इग्नोर किंवा X आयकॉनवर क्लिक करा. (वाचा - WhatsApp वरही करता येईल Call Record, जाणून घ्या ही Simple Trick) डेस्कटॉपवरून व्हिडिओ कॉल करण्यासाठी तुम्हाला खालील सेटिंग्स कराव्या लागतील - - डेस्कटॉपमध्ये विंडोज 10 64-bit व्हर्जन, 1903 किंवा नवीन macOS 10.13 किंवा नवीन व्हर्जन असणं आवश्यक आहे. - व्हिडीओ कॉल करण्यासाठी ऑडिओ आउटपुट डिव्हाईस, एक मायक्रोफोन आणि कॅमेरा आवश्यक आहे. - कॉम्प्युटरच्या साउंड सेटिंग्जद्वारे, मायक्रोफोन, स्पीकर्स आणि कॅमेरा काम करत असावा. - कॉल अधिक चांगला होण्यासाठी आणि चांगल्या ऑडिओसाठी हेडसेटचा वापर करणं आवश्यक आहे. मायक्रोफोन आणि स्पीकर डिव्हाईस वापरल्याने प्रतिध्वनी तयार होऊ शकतो. - व्हर्च्युअल ऑडिओ आणि व्हिडीओ डिव्हाइस सपोर्ट करत नाहीत. - तुमच्या कॉम्प्युटर आणि फोनमध्ये इंटरनेट असणं आवश्यक आहे. - युजरने कॉम्प्युटरचा मायक्रोफोन आणि कॅमेरा वापरण्यासाठी व्हॉट्सअ‌ॅप परवानगी देणं आवश्यक आहे. अ‌ॅपला कॉलसाठी मायक्रोफोन आणि व्हिडीओ कॉलसाठी कॅमेर्‍याचा अक्सेस असेल. - डेस्कटॉपवरून तुम्ही ग्रुप व्हिडीओ कॉल करू शकत नाही. - तुमच्या फोन आणि कॉम्प्युटरमध्ये व्हॉट्सअ‌ॅपचं लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे.
Published by:Karishma Bhurke
First published: