मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कार चोरी झाली तर मिनिटांमध्येच शोधून काढेल हे डिव्हाईस, किंमत फक्त 1099 रुपये!

कार चोरी झाली तर मिनिटांमध्येच शोधून काढेल हे डिव्हाईस, किंमत फक्त 1099 रुपये!

विविध कंपन्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेल्या कार (Car) भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. नवीन कार खरेदी करताना ग्राहक सुरक्षेसह अनेक गोष्टी विचारात घेतात. या पार्श्वभूमीवर ग्राहक विविध सेफ्टी डिव्हाइसेस (Safety Device) खरेदी करण्यावर भर देत आहेत.

पुढे वाचा ...
मुंबई, 9 ऑगस्ट : विविध कंपन्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स असलेल्या कार (Car) भारतीय बाजारात उपलब्ध आहेत. नवीन कार खरेदी करताना ग्राहक सुरक्षेसह अनेक गोष्टी विचारात घेतात. गेल्या काही वर्षांत भारतात कारचोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक विविध सेफ्टी डिव्हाइसेस (Safety Device) खरेदी करण्यावर भर देत आहेत. ही डिव्हाइसेस तुलनेनं खूप महाग असतात. परंतु, आता सेफ्टी डिव्हाइसवर फार खर्च करण्याची गरज नाही. कारण अ‍ॅमेझॉनवर एक खास सेफ्टी डिव्हाइस उपलब्ध झालं आहे. हे डिव्हाइस वापरून तुम्ही तुमची कार सुरक्षित ठेवू शकता. तसंच, समजा कार चोरीस गेली तर ती कमी वेळात शोधूदेखील शकता. देशात कारचोरीच्या (Car theft) घटना वेगानं वाढत आहेत. कारचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. तरीदेखील या घटना कमी होत नसल्याचं चित्र आहे. कार चोरी होऊ नये, यासाठी ग्राहक आपल्या वाहनात सेफ्टी डिव्हाइस बसवतात. ही डिव्हाइसेस तुलनेनं महाग असतात. आता केवळ 1000 रुपये किंमत असलेलं एक छोटं सेफ्टी डिव्हाइस (Tiny Safety Device) बाजारात उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवरून तुम्ही ते खरेदी करू शकता. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या कारमध्ये हे डिव्हाइस लावलं आहे, ही बाब चोराला कळत नाही. V88R कार जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस ( Car GPS Tracking Device) असं या छोट्या, पण उपयुक्त डिव्हाइसचं नाव आहे. तुम्ही कारच्या सुरक्षिततेसाठी हे डिव्हाइस वापरू शकता. विशेष म्हणजे, तुम्ही या डिव्हाइसच्या मदतीनं तुमची कार जगभरात कुठेही असली, तरी तिचं ट्रॅकिंग करू शकता. ज्या वाहनात हे डिव्हाइस बसवलेलं असेल, ते वाहन सहज लोकेट (Locate) करता येतं. अन्य सेफ्टी डिव्हाइसच्या तुलनेत हे डिव्हाइस स्वस्त आहे. हे पॉकेट साइज सेफ्टी डिव्हाइस तुम्ही अ‍ॅमेझॉवरून (Amazon) खरेदी करू शकता. सध्या या डिव्हाइसच्या किमतीवर 45 टक्के डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटमुळे 1999 रुपयांचं डिव्हाइस तुम्ही 1099 रुपयांत खरेदी करू शकणार आहात. या डिव्हाइसमध्ये अनेक फीचर्स आहेत. यात व्हॉइस रेकॉर्ड, रिअल टाइम ट्रॅकिंग, व्हॉइस मॉनिटर आणि सुपर मॅग्नेटिक फोर्स आदी फीचर्स (Features) आहेत. या डिव्हाइसचा आकार खूप लहान आहे. त्यामुळे तुम्ही कारच्या डॅशबोर्डखाली देखील हे डिव्हाइस बसवू शकता. विशेष म्हणजे या डिव्हाइसविषयी कोणतीही माहिती चोराला समजू शकणार नाही. तसंच तुम्ही तुमची चोरी झालेली कार स्मार्टफोनच्या मदतीनं ट्रॅक करू शकता.
First published:

पुढील बातम्या